

खोपोली (ठाणे) : शहरी भागासह पनवेल व खालापूर तालुक्याला जोडणाऱ्या मुंबई-पुणे हायवेला असणाऱ्या खालापूर पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या लोधिवली येथील समुद्राबारवर मंगळवार (दि.12) रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास खालापुर पोलिसांनी धडक कारवाई केली. याठिकाणी अश्लिल हावभाव आणि डीजेच्या तालावर नृत्य करीत असताना आढळून आल्याने १३ जणांना अटक केली आहे.
समुद्राबारमध्ये महिला आरोपी महीला वेटर्स ही संगिताच्या तालावर हावभाव व बिभत्स नृत्य करताना मिळून आली. अन्य १२ आरोपी हे बारमध्ये आलेले ग्राहक व हॉटेलमधील स्टाफ, वेटर्स व त्यातील काही ग्राहक हे मद्यसेवन करुन या महिलेला अश्लिल नृत्य बिभत्स्य नृत्य करण्याकरीता प्रोत्साहित करीत होते. हॉटेलमधील स्टाफ व वेटर्स हे सुद्धा बिभत्स्य नृत्य करीत असलेल्या महिलेला साथ देत होते. तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने आरडाओरड करुन सार्वजनिक शांततेचा भंग करीत होते. हॉटेलचे मालकानेही (रा. रिस ता. खालापूर) हॉटेल समुद्राबारसाठी दिलेल्या परवानग्यांच्या अटी व शर्तीचे उल्लंघन करीत असल्याचे माहिती मिळताच खालापूर पोलिसांनी धडक कारवाई करीत १३ जणांना अटक केली. याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर पोलीस हे करीत आहेत.
पनवेलमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी बार फोडत लेडीज बार बंद करण्याची मागणी केली आहे. मनसेच्या या कामगिरीचे कौतुक करीत बार बंद करावे, अशी मागणी होत असताना खालापूर पोलिसांनी लोधिवली येथील समुद्राबारवर कारवाई करीत खाकी वर्दीचा धाक दाखवून दिला आहे. त्यामुळे बार मालकांचे धाबे दणाणले आहेत.