Fire accident : लोढा गृहसंकुल आगीत एकाचा मृत्यू, दोघे जखमी

२२ व्या माळ्यावर लागली आग
Fire accident
लोढा गृहसंकुल आगीत एकाचा मृत्यू, दोघे जखमी(Pudhari File Photo)
Published on
Updated on

ठाणे : ठाण्याच्या कोलशेत रोडवरील लोढा अमारा गृहसंकुलात २२व्या माळ्यावर आग लागण्याची घटना गुरुवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीच्या घटनेत दोनजण गंभीर जखमी झाले. तर जयश्री ठाकरे (३६) वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. तर राजेंद्र तिवारी याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

गुरुवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कोलशेत एअर फोर्स जवळ, लोढा अमारा, कोलशेत रोड, ठाणे (प.) ही २८ माळ्याची इमारत आहे. याचा इमारतीत कासा फ्रेस्को बिल्डिंग विंग ८ या इमारतीच्या २२ मजल्यावर मोठी आग लागली. घटनास्थळी मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके, कापुरबावडी पोलीस अधिकारी व कर्मचारी, महानगर कर्मचारी, महावितरण कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान १ ब्रँटो वाहन, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान १ बससह, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०२- पीकअप वाहनासह, ०५ रुग्णवाहिका हजर झाले.

या आगीच्या घटनेत राजेंद्र तिवारी हे जखमी झाले. तर २८ व्या माळ्यावर राहणारी महिला जयश्री ठाकरे (३६) या गंभीर जखमी झाल्या होत्या. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून उपचार सुरू केले. तर डॉक्टरांनी जयश्री ठाकरे यांना मृत घोषित केले. महिलेचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला. आग ७:५८ वाजताच्या सुमारास आग पूर्णपणे विझविण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news