मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर कितीही सकारत्मक, नकारत्मक टीका होत असली तरी बहिणींचा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात चांगला प्रतिसाद आहे.
योजना सुरू झाल्यापासून ते आजतागयत ठाणे जिल्ह्यात 7 लाख 29 हजार 417 लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. सर्वाधिक लाडक्या बहीणींची संख्या ठाणे महापालिका क्षेत्रात आहे. शहरातील सुमारे 1 लाख 86 हजार 295 लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी आहेत.
21 ते 60 वर्षे वयोगटातील तसेच ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजारपर्यंतच आहे, अशा महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत. जून 2024 पासून प्रती माह 1500 रुपये महिलांना देण्यात येत आहे.