Pavitra Portal: शहापुरात पवित्र पोर्टल भरतीपूर्व तयारीला वेग; बिंदुनामावली पडताळणीसाठी संस्थांना सूचना

शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, अचूक आरक्षण नोंदी व नियमबद्धता राखण्यासाठी बिंदुनामावली तपासणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
Pavitra Portal
Pavitra PortalPudhari
Published on
Updated on

शहापूर : कोकण विभागातील सर्व शैक्षणिक संस्था, अनुदानित शाळा व महाविद्यालयांसाठी पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी शनिवारी 16 मे रोजी बिंदुनामावली तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

सदर शिबीर सहायक आयुक्त कोकण विभाग, कोकण भवन यांच्या कार्यालयामार्फत राबविण्यात येणार असून संबंधित संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Pavitra Portal
Pali Bhutivali dam project: कोट्यवधींचा खर्च, तरी पाली-भुतिवली धरण अपूर्णच; पाली-भुतिवली प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, अचूक आरक्षण नोंदी व नियमबद्धता राखण्यासाठी बिंदुनामावली तपासणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पवित्र पोर्टल अंतर्गत होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी संस्थांनी तयार केलेल्या आरक्षण बिंदुनामावलीची अंतिम पडताळणी या शिबिरात केली जाणार आहे.

संबंधित शाळा, संस्था, महाविद्यालयांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. दरम्यान प्राप्त माहितीनुसार ज्या शाळा, संस्था किंवा महाविद्यालयांची शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक तसेच विद्यापीठ स्तरावरील प्राथमिक तपासणी पूर्ण झालेली आहे. अशाच संस्थांची अंतिम तपासणी करण्यात येणार आहे.

Pavitra Portal
Savitri river bridge issue: खाडीपट्टावासीयांना यंदाही करावा लागणार पुराशी सामना; रावढळ पुलाचे काम रखडलेलेच

त्यामुळे प्राथमिक मंजुरी नसलेल्या संस्थांची तपासणी होणार नसल्याचे पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. तथापि शिबिरासाठी येणाऱ्या संस्थांनी दुपारी 12 वाजेपर्यंत नोंदणी करणे बंधनकारक राहणार असून, नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच संबंधित प्रकरणांची तपासणी करण्यात येणार आहे. उशिरा येणाऱ्या संस्थांना प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे वेळेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तपासणी प्रक्रियेदरम्यान संबंधित कागदपत्रे, परिशिष्टे, मंजुरी आदेश, आरक्षण बिंदुनामावली, कर्मचारी माहिती संपूर्ण संचिका सोबत आणणे आवश्यक असल्याचे कोकण विभाग, कोकण भवन सहाय्यक आयुक्त अंजली पवार यांनी काढलेल्या पत्राद्वारे कळवले आहे.

आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असल्यास संबंधित प्रस्ताव प्रलंबित ठेवला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पवित्र पोर्टल अंतर्गत होणारी शिक्षक भरती प्रक्रिया हजारो उमेदवारांसाठी महत्त्वाची मानली जात असून यामुळे रिक्त पदांवरील भरतीला वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news