

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी कल्याण-डोंबिवलीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आक्रमक पावले उचलली आहेत.
विद्रुपीकरणासह वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या भंगार वाहनांच्या उचलबांगडी कारवाईला पुन्हा सुरूवात करण्यात आली आहे. केडीएमसी च्या ६/ फ प्रभागात रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बेवारस आणि भंगार वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूकीची कोंडी कमी व्हावी आणि पादचाऱ्यांना रस्त्यावरील रहदारीतून ये-जा करणे सुलभ व्हावे या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी आता कठोर पावले उचलली आहेत. आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या निर्देशांनुसार ६/फ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी ठाकुर्ली पूर्वेकडे असलेल्या 90 फीट रोड परिसरातील रस्ते आणि फूटपाथवर गेल्या अनेक दिवसांपासून उभी असलेली असलेली ३ तीन चाकी वाहने (रिक्षा), १ चारचाकी वाहन (छोटा टेम्पो)) अशी एकूण ४ बेवारस वाहने जप्त करून खंबाळपाड्यातील वाहनतळावर जमा केली. ही कारवाई अतिक्रमण निर्मूलन विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने १ हायड्रा आणि १ डंपरच्या साह्याने करण्यात आली. सहाय्याने करण्यात आली.