KDMC News | केडीएमसीच्या शाळांमध्येही अग्नीसुरक्षा सुविधा; बारावे शाळेपासून प्रारंभ

सीसीटिव्ही कॅमेऱ्यांपाठोपाठ आग प्रतिबंधक उपकरणांचे प्रशिक्षण
डोंबिवली, ठाणे
कल्याणच्या बारावे येथील शाळेपासून आग प्रतिबंधक उपकरणांबाबत प्रशिक्षणास प्रारंभ करण्यात आला आहे. Pudhari News Network
Published on
Updated on

डोंबिवली : सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये अग्नी सुरक्षा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी शाळांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पाऊल उचलले आहे.

Summary

कल्याणच्या बारावे येथील शाळेपासून आग प्रतिबंधक उपकरणांबाबत प्रशिक्षणास प्रारंभ करण्यात आला आहे. प्रत्येक शाळांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केल्यानंतर आता आग प्रतिबंधक उपकरण संदर्भात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

डोंबिवली, ठाणे
शाळांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केल्यानंतर आता आग प्रतिबंधक उपकरण संदर्भात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.Pudhari News Network

केडीएमसीच्या विद्यमान आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी पदभार स्वीकारल्यापासून महापालिका शाळांचा प्राधान्याने कायापलट करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार शाळा दुरूस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत. आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या निर्देशांनुसार आणि शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळा स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित असाव्यात या दृष्टिकोनातून महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये ६५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याच पाठोपाठ शाळांतील सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आता महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये अग्नि प्रतिबंधक उपकरण (fire extinguisher) बसविण्यात आली आहेत. या अग्नि प्रतिबंधक उपकरण (fire extinguisher) चा वापर कसा करावा ? आग लागण्याची प्रमुख कारणे काय ? आग कशी विझविता येते ? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे वजा माहिती अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी व केंद्र अधिकारी विनायक लोखंडे यांनी अत्यंत सुलभ भाषेत बारावे येथील शाळेतील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना दिली. शिवाय तसे प्रात्यक्षिकही शिक्षकांसह विद्यार्थ्यांमार्फत शुक्रवारी करवून घेतले. महापालिकेच्या उर्वरित शाळांमध्येही हे प्रशिक्षण तेथील शिक्षकांसह विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. महापालिकेच्या अग्निशमन केंद्रांवरही अशा प्रकारचे प्रशिक्षण विद्यार्थांना दिले जाते.

डोंबिवली, ठाणे
केडीएमसीच्या विद्यमान आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी पदभार स्वीकारल्यापासून महापालिका शाळांचा प्राधान्याने कायापलट करण्याचा संकल्प केला आहेPudhari News Network

कोरोना काळातील उपकरणांचा पुनर्वापर

कोरोना महामारीच्या कालावधीत टाटा आमंत्रण येथे बसवलेल्या अग्नि प्रतिबंधक उपकरण (fire extinguisher) चा पुनर्वापर महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली. यावेळी महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, शिक्षणाधिकारी विजय सरकटेयांच्यासह बारावे शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news