KDMC Election Polling Centers: केडीएमसी सार्वत्रिक निवडणूकीचे मतदान केंद्रे निश्चित

कल्याण-डोंबिवलीतील १६०४ केंद्रांसह ३९२ लोकेशनवर होणार मतदान
KDMC BJP Unopposed Victory
KDMC BJP Unopposed VictoryPudhari
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी १६०४ मतदान केंद्रांच्या एकूण ३९२ लोकेशनवर मतदानाची प्रक्रिया संपन्न होणार आहे. त्यासाठी केडीएमसी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून प्रभागनिहाय मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.  

यापैकी तळ मजल्यावर १०५५ मतदान केंद्र, पहिल्या मजल्यावर ९ मतदान केंद्र, पार्टिशन स्वरुपात ४८२ मतदान केंद्र आणि मंडपात ५८ मतदान केंद्र राहतील. तर १६ ठिकाणी १० पेक्षा जास्त मतदान केंद्र ठिकाणे असणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी - १ यांच्या निवडणूक प्रभागांत ५५, निवडणूक निर्णय अधिकारी - २ यांच्या निवडणूक प्रभागांत ४७, निवडणूक निर्णय अधिकारी - ३ यांच्या निवडणूक प्रभागांत ४०, निवडणूक निर्णय अधिकारी - ४ यांच्या निवडणूक प्रभागांत २८, निवडणूक निर्णय अधिकारी - ५ यांच्या निवडणूक प्रभागांत ४७, निवडणूक निर्णय अधिकारी - ६ यांच्या निवडणूक प्रभागांत ४१, निवडणूक निर्णय अधिकारी - ७ यांच्या निवडणूक प्रभागांत ४७, निवडणूक निर्णय अधिकारी - ८ यांच्या निवडणूक प्रभागांत ४० व निवडणूक निर्णय अधिकारी - ९ यांच्या निवडणूक प्रभागांत एकूण ४७ लोकेशन्सवर मतदान प्रक्रिया संपन्न होईल.

वृद्ध, दिव्यांग, गर्भवती महिला, इत्यादींना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी तळमजल्यावर जास्त प्रमाणात मतदान केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहेत. मतदानाच्या वेळी रॅम्प, व्हीलचेअर, आदी सुविधा आवश्यकतेनुसार मतदारांना पुरविल्या जाणार आहेत. या सार्वत्रिक निवडणूकीसाठी पुरूष मतदारांची संख्या ७ लाख ४५ हजार ६६४, महिला मतदार संख्या ६ लाख ७८ हजार ८७०, तर इतर मतदारांची संख्या ५५२ इतकी असून एकूण मतदारांची संख्या १४ लाख २५ हजार ८६ इतकी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news