

ठाणे : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महायुतीतील शिवसेना शिंदे गट व भाजप पक्षात महापौर पदासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. शिंदे सेनेचे ५३ तर भाजपाचे ५० नगरसेवक निवडून आले आहेत. स्थापनेसाठी ६२ चा जादुई आकडा गाढण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे.
विरोधी पक्षाचे निवडून आलेले शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ११ तर मनसेचे ५ असे ठाकरे बंधू युतीचे १६ नगर सेवक गेमचेंजर ठरणार आहेत. शिवसेना शिंदे पक्षातून उमेदवारी न मिळालेले सहा सात नवनियुक्त नगरसेवक उबाठा आणि मनसे पक्षातून निवडून आल्याने त्याची मनधरणी करून सत्ता स्थापनेसाठी शिवसेना शिंदे गट प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. तर मनसेचे दोन नगरसेवक ठाकरे गटाच्या चिन्हावर लढले असून ते जिकूंन आले आहेत, त्यामुळे मनसेकडे 7 नगरसेवक आहेत.
या निवडून आलेल्या नवनियुक्त नगरसेवक आपल्या सोबत यावे आणि मनसे सोबत युती करावी असे प्रयत्न भाजप आणि शिंदेची शिवसेना करत असली तरी शिंदेची शिवसेना आणि मनसे यांच्यात युती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहें..