

ठाणे: इस्रोचे माजी प्रमुख के कस्तुरीरंग यांनी १२ वर्षांपूर्वी पश्चिम घाटासंबंधी दिलेला अहवाल केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने आता कार्यवाहीसाठी घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि कर्नाटक अश्या चार राज्यांच्या कार्यक्षेत्रातील पश्चिम घाटातील क्षेत्र पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर केले जाणार आहे.
पश्चिम घाटाचा अभ्यास करून माधवराव गाडगीळ समितीने पहिला अहवाल दिला होता. यामध्ये पश्चिम घाटातील १०० टक्के क्षेत्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्याचा अहवाल दिला होता. मात्र यावर सर्वच राज्यातून प्रचंड विरोध झाल्यामुळे केंद्र सरकारने के केअस्तुरीरंगात यांच्या नेतृत्वाखाली दुसरी समिती गठीत केली.
या समितीने पश्चिम घाटाच्या डोंगर माथा आणि पायथ्यावरील क्षेत्र संवेदनशील जाहीर करावे असा अहवाल दिला होता. तोच अहवाल हेली १२ वर्षे केंद्र सरकारने स्वीकारला नव्हता. मात्र आता जागतिक सर्वच स्तरावर दबाव वाढल्यानंतर हा अहवाल स्वीकारण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.
यामुळे पश्चिम घाटातील खान उद्योग जांभा दगड उत्खनन या सर्वच उद्योगावर मर्यादा येणार आहे. पश्चिम घाटामध्ये हजारो दुर्मिळ वनस्पती, प्राणी, पक्षी आढळतात. त्यामुळे जगातील १२ जैवविविविधतेतील हॉटस्पॉटमध्ये या भागाचा समावेश आहे. प्रामुख्यने गोदावरी, कृष्ण, कावेरी या नद्यांचे उगम सह्याद्री पर्वतात आहेत. शिवछत्रपतींच्या सिंहगड, प्रतापगड, रायगड, प्रतापगड हे महत्वाचे किल्लेही या पश्चिम घाटात आहेत.
महाबळेश्वर, माथेरा, लोणावडा यासारखी थंड हवेची ठिकाणेही आहेत. या सह्याद्री मध्ये उष्ण कटिबंधीय जंगले , काटेरी झुडपे, मोठ्या प्रमाणावर आहेत. पश्चिम किनाऱ्याला समांतर असलेली ही पर्वतरांग घनदाट जंगल, वैविध्यपूर्ण वनस्पती यामुळे प्रसिद्ध आहे. या भागामध्ये पावसाचे प्रमाणही खूप आहे.
पश्चिम घाट हा १६०० किमी लांबीचापट्टा आहे. घनदाट जंगलांमध्ये साग, बांबू, पळस असे सदाहरित वृक्षांच्या जाती आहेत. हे जंगल महाराष्ट्र, गुजराथ, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये येते. या डोंगरांची सरासरी उंची १२०० मीटरपर्यंत आहे. तर ६० हजार चौरस किमी एवढा हा प्रदेश आहे.
कळसुबाई शिखर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, कुंडरमुख शिखर,अनाईमुंडी शिखर ही सर्वात उंच शिखरे आहेत. येथे १८७ पेक्षा सरी सुपाच्या जती आहेत. तर बेडकांच्या १०० हुन अधिक जाती आढळतात. तर ५ हजारहून जास्त फुलझडी आहेत. या जैवविविधतेमुळे आता हा भाग संरक्षित भाग म्हणून घोषित केला जाणार आहे.
दाट जंगले मुख्यत: आदिवासी लोकांसाठी उपयुक्त
पश्चिम घाटातील दाट जंगले ही मुख्यत: आदिवासी लोकांसाठी खूप उपयुक्त आहेत. त्यांना लागणारे अन्न व निवारे या जंगलांमध्ये मुबलक प्रमाणात मिळतात. या दाट जंगलांमुळेच पठारावरील लोक इथे स्थायिक होऊ शकले नाहीत. भारतात आल्यावर इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर जंगले साफ करून जमीन शेतीयोग्य बनविली.१९८८ मध्ये पश्चिम घाटाला पर्यावरणशास्त्रज्ञ नॉर्मन मायर्स यांच्या प्रयत्नांमुळे संरक्षित जैविक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले.
जरी पश्चिम घाट हा भारताच्या फक्त ५% क्षेत्रफळावर पसरलेला असला तरी भारतातील उंच वाढणाऱ्या झाडांच्या १५,००० जातींपैकी सुमारे ४,००० जाती (२७%) या इथेच सापडतात. यापैकी सुमारे १,८०० जाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात. सह्याद्री रांगेत जवळजवळ ८४ उभयचर प्राण्यांच्या जाती, १६ पक्ष्यांच्या जाती, ७ प्रकारचे सस्तन प्राणी व १,६०० प्रकारची फुलझाडे आढळतात जी जगात इतरत्र कोठेही आढळत नाहीत.भारत सरकारने पश्चिम घाटातील अनेक जंगले संरक्षित केलेली आहेत.
यामध्ये २ संरक्षित जैविक क्षेत्रे, १३ राष्ट्रीय उद्याने, अनेक अभयारण्ये वगैरेंचा समावेश होतो. ही सर्व संरक्षित वनक्षेत्रे जतन करण्यासाठी वेगळे वनखाते बनवून या जंगलांचे रक्षण करण्यात येत आहे. यापैकी अनेक राष्ट्रीय उद्याने ही पूर्वी अभयारण्ये होती. निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र हे जवळजवळ ५,५०० वर्ग कि.मी. क्षेत्रफळावर पसरलेले सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र आहे.
यामध्ये नागरहोलची सदाहरित जंगले, बांदीपूर राष्ट्रीय उद्यानातील पानगळीची जंगले, कर्नाटकातील नुगू जंगल व केरळ व तमिळनाडूमधील अनुक्रमे वायनाड व मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान यांचा समावेश होतो.[९] केरळमधील पश्चिम घाटात अनेक थंड हवेची ठिकाणे प्रसिद्ध आहेत. यामध्ये मुन्नार, पोन्मुदी व वायनाड ही प्रमुख ठिकाणे आहेत. केरळमधील सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान हे भारतातील शिल्लक असलेल्या सदाहरित जंगलांपैकी एक आहे. भारतात दोन ठिकाणी जैविक विविधता आढळते पहिली पूर्व घाट आणि दुसरा पश्चिम घाट.