Thane murder case : हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप

शाम गौड हत्या प्रकरण; एकाला 3 वर्षाची शिक्षा, दोघांची निर्दोष मुक्तता
Thane murder case
हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपfile photo
Published on
Updated on

ठाणे : काश्मिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या शाम लहरी गौड याच्या राहत्या घरी 6 एप्रिल, 2017 रोजी आलेल्या अज्ञात आरोपीनी गोळी मारून हत्या करुन पळणाऱ्या चार आरोपींना काशिमीरा पोलिसांनी अटक केली. सदर प्रकरण अंतिम सुनावणीसाठी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालय-3 यांच्या न्यायालयात सुरू होती.

विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी सादर केलेले साक्षी पुरावे आणि तपास अधिकारी यांनी दिलेल्या घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्यधरत न्यायमूर्ती डी.एस.देशमुख यांनी हत्या आणि प्लॅनिंगबाबत दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर अन्य दोन आरोपींना सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचा निकाल न्यायालयाने दिला.

घटनेच्या दिवशी 6 एप्रिल 2017 रोजी पहाटे 2.00 वाजण्याच्या सुमारास यातील फिर्यादी संगिता शामु गौड (35) रा. शेट्टी चाल जुन्या मिरा पोस्ट ऑफिस जवळ एमटीएनएल च्या बाजुला एमआयडीसीरोड मिरागाव मिरारोड (पु) ता. जि.ठाणे मुळ रा. ग्राम टिकुर मौलानी तहसिलबासी जिल्हा सिद्धार्थ नगर उत्तर प्रदेश येथील मोर्चा असून शाम लहरी गौड (40) घरात झोपले असताना मी बाजूला राहतो माझ्याकडे चावी नाही, असे म्हणत मृतक शाम याने अर्धा दरवाजा उघडला.

Thane murder case
Illegal water extraction : बारवी धरणातून लाखो लिटर पाण्याची चोरी?

अग्निशस्त्रातून गोळीबार करून चार आरोपी पळाल्याची तक्रार पत्नी संगीता काश्मीरा पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास करीत आरोपी सुनीलकुमार बितुली रजक (36), सुदीपकुमार राजू रविदास (24), उमेश राजू रविदास(24) आणि आशिषकुमार तिलक भुईया(20) चारी ही आरोपी मुळचे झारखंड राज्यात राहणारे आहेत.

ठाणे जिल्हा व सत्र न्यायालय - 3 चे न्यायमूर्ती डी. एस. देशमुख यांच्या दलनात विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी सरकारच्या वतीने युक्तिवाद करीत न्यायालयात साक्षीदार आणि पुरावे सादर केले तर घटनास्थळाचे परिस्थितीजन्य पुरावे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी न्यायालयात सादर केले. न्यायमूर्ती डी. एस. देशमुख यांनी न्यायालय समोर असलेले साक्षी पुरावे ग्राह्य धरीत आरोपी सुनीलकुमार बितुली रजक, आरोपी सुदीपकुमार राजू रविदास या दोघांना आजन्मठेपेची शिक्षा आणि एक लाखाचा दंड, दंड न भरल्यास एक वर्षाची अतिरिक्त करीत अशी शिक्षा हत्या आणि प्लॅनिंग बाबत ठोठावली.

Thane murder case
Alphonso mango production : हापूसची एपीएमसीची यंदाची गुढी केवळ 10 हजार पेट्यांची

आर्म्स कायद्यात दोषी ठरवित दोन्ही आरोपींना तीन वर्षाचा कारावास आणि दंड ठरवण्यात आला तर या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपी उमेश राजू रविदास आणि आशिषकुमार तिलक भुईया या दोघांच्या विरोधात सबळ पुरावा नसल्याने पुराव्याचे अभावी दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचा निकाल न्यायमूर्ती डी. एस. देशमुख यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news