Kasara News : सर्पदंश झाला.... रस्ता नसल्याने उपचार करण्यासाठी डोलीतून नेले पण...., वाटेतच सोडला ९ वीच्या विद्यार्थ्याने जीव!

वेळेत  उपचार न मिळाल्याने इयात्ता 4 थीत शिकणाऱ्या मुलावर दुर्देवी वेळ, शहापूर तालुक्यातील शिसवली गावातील घटनेने सारे हळहळले
Kasara News
मृत जगन्नाथ दापट याला डोलीतून घेऊन जाताना
Published on
Updated on

कसारा : गावापासून मुख्य रस्त्याला यायला रस्ताच  नसल्याने आज डोली करून पायी पायी पाच  किलोमीटर अंतर चालत  रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या एका नऊ वर्षाच्या मुलाचा वेळेत उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.

वय ९ वर्ष रा शिसवली फाटा असे मयत मुलाचे नाव आहे. शहापूर तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायत हद्दीतील शिसवली गावातील जगन्नाथ दापट वय ९ वर्ष हा इयत्ता ४थीत शिकणाऱ्या मुलाला घरात  झोपेत असताना  सर्पदंश झाला. मुलाला साप चावल्याचे सकाळी पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ गावातील तरुणांना सोबत घेत मुलाला जवळील  प्राथमिक आरोग्य उप केंद्रात घेऊन जाण्याची तयारी केली.

Kasara News
Bhiwandi Building Collapse: भिवंडीत १० बळींनंतर बिल्डर, कंत्राटदारावर गुन्हा

परंतु रस्ता नसल्याने व दरीतून  चढ उतार असल्याने गावातील तरुणांनी डोली करून सर्पदंश झालेल्या जगन्नाथ या मुलाला घेऊन निघाले. एकीकडे पाऊस तर दुसरीकडे निसरडा रस्ता पार करीत डोली घेऊन निघसलेल्या तरुणांनी व मुलाच्या नातेवाईकांनी ५ किलोमीटर अंतर पार करीत दहिगाव गाठले. तेथे उपकेंद्रात कोणी नसल्याने खासगी गाडी करून जगन्नाथ यास खर्डी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. परंतु मुलाची प्रकृती गंभीर झाल्याने त्यास ठाणे येथे पाठवण्यात आले मात्र तो पर्यत उशीर झाला जगन्नाथ ला ठाणे सिव्हिल रुग्णालयात घेऊन जाण्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान  दहिगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या या शिसवली पाड्यात मात्र रस्ता नसल्याने ५ किलोमीटरचा अंतर डोली करुन पायी प्रवास करून दहीगाव येथे मुख्य रस्त्या पर्यंत यावे लागले, व तेथून गाडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र पाच किलोमीटर अंतर डोलीने प्रवास करण्यासाठी जो वेळ लागला त्यात सर्पदंशाने मुलाची तब्येत खालावल्यामुळे रूग्णालयात उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर  मुलाचा मृत्यू झाला. जर रस्ता असता तर वेळेत उपचार मिळाला असता तर आज जगन्नाथ दापट जीवंत असता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news