Kasara Mountains : कसारातील डोंगरावर मौल्यवान झाडांची बेकायदेशीर कत्तल

सुरुंग स्फोटाने घरांना तडे; वन्यजीवांची पाण्यासाठी वणवण
Tree cutting News
Kasara Mountains : कसारातील डोंगरावर मौल्यवान झाडांची बेकायदेशीर कत्तलPudhari File Photo
Published on
Updated on

कसारा (ठाणे) : शाम धुमाळ

कसारा येथील मोखावणे गावासमोर असलेल्या महाकाय डोंगरावर शासकीय नियम अटी शर्थीना तिलांजली देत बेकायदेशीररित्या ओपन ब्लास्टिंगसह साग, खैर, निलगिरी, पळसाच्या झाडांची बेकायदेशीर कत्तल केली असून गौण खनिज वाहतुकीसाठी अवैध रित्या शॉर्ट कट रस्ते तयार केले आहेत. हे रस्ते तयार करताना विकासकांनी डोंगर टेकडीवरील जलस्रोत माती भराव करून बुजवून टाकले आहेत, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जिलेटिनसारखे स्फोटक वापरून डोंगर फोडून वाहणारे जलस्रोत आपल्या खासगी जागेत वळवले आहेत.

असे असताना संबंधित प्रशासन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याऐवजी त्यांना मोकळीक देत असल्याचे समजते. या ओपन ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना तडे गेले आहेत, तर अनेक ठिकाणीच्या विहिरीतील पाण्याचे स्रोत कमी होण्याची शक्यता आहे. त्याचाच परिणाम २०० मीटरवर असलेल्या नॅशनल हायवे क्रमांक ३ व रेल्वे ट्रॅक वर होत आहे,

तर नियमित होणाऱ्या ओपन ब्लास्टिंगमुळे चरण्यासाठी येणारी जनावरे भयभीत होत आहेत, तर शेकडो झाडांची कत्तल करून नैसर्गिक जलस्रोत असलेले नाले, झिरा, पाझर तलावात माती, दगडांचा भराव करून नैसर्गिक जलस्रोत बुजवून टाकले आहेत.

वन्यजीवांना पाण्यासाठी घुटमळावे लागत आहेच, पण पाणीटंचाई काळात एप्रिल, मे, जून, या दरम्यान लगतच्या गावपाड्यातील लोकांना मिळणारा पाणी साठा सदर कंपनी बंद केला असल्याचे दिसून येते.

Tree cutting News
Chhatrapati Sambhajinagar | हृदयद्रावक! आईने मोबाईल दिला नाही म्हणून, मुलाने उचललं टोकाचे पाऊल, डोंगरावर चढला अन्....

भविष्यात पाणीटंचाईच्या समस्या

सुरू असलेल्या या कामापासून हाकेच्या अंतरावरवर कसारा शहरास पाणी पुरवठा करणारा तलाव व नदी पात्र आहे. ते बुजवल्याने भविष्यात अवैध सुरुंग स्फोटामुळे भविष्यात पाणी टंचाईच्या समस्या भेडसावणार आहेत. आगोदरच पाण्यासाठी वणवण करणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. दरम्यान या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी प्रशासनाकडे केल्या; परंतु ग्रामस्थांच्या तक्रारी अर्जा वर अद्याप ठोस कारवाई झाली नाही. वनसंपदा व नैसर्गिक जलस्रोत यांना तिलांजली देत रुस्तमजी बिल्डरचे काम सध्या बेकायदेशीररीत्या सुरू आहे. महसूल व वनविभाग यांचे कडून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कसारा व मोखावणे ग्रामस्थांनी केली आहे.

वन्यजीवांची घुसमट

ठिकठिकाणी होणारी ओपन ब्लास्टिंग व त्यामुळे होणारा धरणीकंप व माती, दगड गोटे यांचा धुराळा यामुळे नागरिकांपाठोपाठ वन्यजिवांची घुसमट होत असून कंट्रोल ब्लास्टची परवानगी असताना विकासकाकडून बेकायदेशीररीत्या ज्वलनशील स्फोटके वापरून लोकांच्या जीवाशी खेळ करीत असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news