Kalyan Railway News | कल्याणात वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करुन व्हिडीओ बनवणाऱ्या हुल्लडबाजाला आरपीएफकडून अटक

कल्याणजवळील पत्री पुलाजवळ शुक्रवारी सकाळची घटना
Kalyan Railway News
Kalyan Railway News | कल्याणात वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करुन व्हिडीओ बनवणाऱ्या हुल्लडबाजाला आरपीएफकडून अटक
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याणात वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करून त्याचा व्हिडिओ तयार करणाऱ्या हुल्लडबाज तरूणाला कल्याण आरपीएफ पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना कल्याणजवळील पत्री पुलाजवळ शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

या संदर्भात लोहमार्ग पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्स्प्रेस कल्याण परिसरातून जात असताना एका तरूणाने या एक्स्प्रेसवर दगडफेक केली. दगडफेक करतानाच त्याने या प्रकाराचा व्हिडिओही तयार केला. या घटनेमुळे रेल्वेच्या सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले असून एक्स्प्रेसमधली प्रवाशांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला.

या घटनेची माहिती मिळताच कल्याण आरपीएफ पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान दगडफेक करणारा हुल्लडबाज सनी कांबळे असल्याचे समोर आले. त्यानंतर आरपीएफने त्याला ताब्यात घेऊन दुपारी अटक केली. हुल्लडबाजी करण्याच्या उद्देशाने सनी कांबळे याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला लोहमार्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची कल्याणच्या आधारवाडी कारागृहात रवानगी केल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news