

नेवाळी ( ठाणे ) : कल्याण शीळ रस्त्यावरील जुना रेल्वे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुलाच्या पाडकामाला सुरुवात करण्यात आली असून येत्या पाच महिन्यांत पुनर्बाधणी करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. यासाठी टाटा कंपनीकडे पुलाच्या कामाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. जुना पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने वाहतूक पोलीस उपायुक्तांनी अधिसूचना जाहीर केली आहे. रेल्वे पुलाचे काम सुरू असल्याने पलावा जंक्शन परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
कल्याण-डोंबिवलीकरांच्या प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला कल्याण शीळ रस्ता पुन्हा वाहतूक कोंडीमुळे चर्चेत येणार आहे. जुन्या निळजे रेल्वे ओव्हरब्रिजची उंची कमी असल्याने डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवरील डबल डेकर कंटेनर वाहतुकीस अडथळा येत होता. हा अडथळा दूर करण्यासाठी पुलाच्या पुनर्बाधणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. रविवारपासून काम सुरू झाले असून ते ३१ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहेत. या कालावधीत परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता ठाणे शहर वाहतूक उपविभागाने व्यापक वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.
मुख्य प्रवेश बंद मार्ग
कल्याण-शिळफाटा, निळजे कमानजवळून सर्व वाहनांना प्रवेशबंद.
पर्यायी मार्ग : निळजे कमान उजवीकडे लोढा पलावा वाहिनी महालक्ष्मी हॉटेल पुढे इच्छित स्थळी.
लोढा पलावा / कासाबेला / हेवन / एक्सपिरिया मॉल कल्याण, निळजे ब्रिज चढणीवरून कल्याणकडे जाणारा मार्ग बंद.
पर्यायी मार्ग : कल्याण-शिळ रोड शिळफाटा देसाई खाडी ब्रिज सरस्वती टेक्सटाईल यू-टर्न पलावा फ्लायओव्हर.
मुंब्रा / कल्याण फाटा कल्याण (६ चाकी व जड वाहने), कल्याण फाटा येथे प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग : शिळफाटा मुंब्रा बायपास खारेगाव टोलनाका.
कल्याण मुंब्रा / कल्याण फाटा (६ चाकी व जड वाहने), काटई (बदलापूर) चौक येथे प्रवेशबंद.
पर्यायी मार्ग : काटई चौक खोणी नाका तळोजा.
तळोजा/नवी मुंबई काटई चौक (६ चाकी व जड वाहने), खोणी नाका, निसर्ग हॉटेल येथे प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग : निसर्ग हॉटेल उजवे वळण बदलापूर पाईपलाइन नेवाळी.
अंबरनाथ/बदलापूर काटई चौक (६ चाकी व जड वाहने), खोणी नाका येथे प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग : खोणी नाका डावे वळण तळोजा.
हलक्या वाहनांसाठी मार्ग
मुंबई/नवी मुंबई कल्याण: दिवा संदप रोड, मानपाडा, कल्याण-शिळ रोड
ठाणे/मुंबई कल्याण मानकोली, मोटागाव, डोंबिवली मार्ग किंवा रांजनोली, कोनगाव, कल्याण मार्ग
कल्याण/डोंबिवली / उल्हासनगर मुंबई/नवी मुंबई : चक्कीनाका
श्री मळगाई पेड, नेवाळी, बदलापूर पाईपलाईन, तळोजा
कल्याण/डोंबिवली ठाणे/मुंबई : डोंबिवली, मोटागाव, मानकोली, दुर्गाडी, कोनगाव, नाशिक-मुंबई महामार्ग