Kalyan Shil Highway Accident | कल्याण-शिळ महामार्गावर कंटेनरखाली चिरडून दोघे स्कूटरस्वार ठार

१९ वर्षीय विद्यार्थ्यासह बेफिकीर कंटेनर चालक अटकेत तर ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावर स्कूटरस्वार महिला जायबंदी
Kalyan Shil Highway Accidents |
कल्याण-शिळ महामार्गावर कंटेनरखाली चिरडून दोघे स्कूटरस्वार ठार Pudhari Photo
Published on
Updated on

डोंबिवली : डोंबिवली जवळच्या कल्याण-शिळ महामार्गासह ठाकुर्लीतील ९० फुटी रस्ता चालकांसह पादचाऱ्यांसाठी असुरक्षित असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. एका १९ वर्षीय शाळकरी मुलाने रस्त्यावर भरधाव वेगात दुचाकी चालवून स्कूटरस्वार महिलेला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ही महिला जबर जायबंदी झाली आहे. घटना शनिवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. या अपघातात सदर महिलेच्या घोट्याचे हाड मोडून सर्वांगाला मार लागला आहे. तर रविवारी रात्रीच्या सुमारास कल्याण-शिळ महामार्गाने भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरखाली चिरडून दोघेही स्कूटरस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. या अपघातास कारणीभूत ठरलेल्या कंटेनरच्या बेजबाबदार चालकास अटक करण्यात आली आहे.

मंत्रालयात नोकरी करणारे आशिष विठ्ठल बोढाळे (४४) हे ९० फुटी रोडला असलेल्या चामुंडा गार्डन सोसायटीत राहतात. त्यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आशिष यांची पत्नी जयश्री (३८) या शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ९० फुटी रोडला असलेल्या म्हसोबा चौकातून स्वतःच्या स्कूटरवरून वेगमर्यादा पाळून जात होत्या. इतक्यात डोंबिवली जवळच्या देसलेपाड्यातील योगम रेसिडेन्सीत राहणारा विद्यार्थी दिव्येश रमेश परब (१९) हा भरधाव वेगात दुचाकी चालवत मागून आला आणि त्याने जयश्री बोढाळे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

Kalyan Shil Highway Accidents |
Dombivali Crime | ‘१५ पेट्या टाक...नाहीतर ढगात पाठवीन’

जयश्री दुचाकीसह रस्त्यावर आदळल्या आणि स्कूटरसह काही अंतरापर्यंत फरफटत गेल्या. वेगाने आपटल्याने त्यांच्या पायाच्या पंजाचे हाड मोडून शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या. अपघात करणारा विद्यार्थी दिव्येश परब याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात बेदरकार दुचाकीस्वार दिव्येश परब याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक कोरडे तपास करत आहेत.

Kalyan Shil Highway Accidents |
Dombivali News: बाप्पाच्या मूर्तीचे पैसे घेतले, चतुर्थीच्या आदल्या दिवशी मूर्तिकार पसार; गणेश भक्तांमध्ये संताप

दुसरा अपघात रविवारी रात्री ११.२० च्या सुमारास कल्याण-शिळ महामार्गावरील डोंबिवली जवळच्या म्हात्रे बसस्टॉप समोर घडला. कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या शिवाजी नगरमधील शिवम सोसायटीत राहणारा शुभम गावडे हा त्याचा मित्र देवेंद्र गोगावले याच्यासह एम एच ०५/ एफ एस/ ८५०६ क्रमांकाच्या स्कूटरवरून मानपाडा सर्कलच्या दिशेने जात होता. इतक्यात भरधाव वेगात पाठीमागून आलेल्या डी डी ०३/पी/९४७१ क्रमांकाच्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात शुभम आणि त्याचा मित्र देवेंद्र हे दोघेही जागीच ठार झाले. या संदर्भात शुभामचा भाऊ समीर चंद्रकांत गावडे (२४) याच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून बेदरकार कंटेनर चालक सुरेशकुमार रामअजोर ४५, रा. भिवंडी) याला अटक केली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप गोरे अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news