

डोंबिवली : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका भिक्षेकरी महिलेवर तिच्या दीड महिन्याच्या बालिकेची विक्री करत असताना सापडली. या बालिकेच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार चार लाख रूपयांचा ठरला. याची माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने वेळीच बालिकेचा विक्री करणाऱ्या भिक्षेकरी आईसह डोंबिवलीतील तीन जणांना कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकात मंगळवारी सापळा लावून अटक केली.
वैशाली किशोर सोनावणे (35, रा. सिध्दार्थनगर झोपडपट्टी, कोपर रोड, डोंबिवली-पश्चिम) या दलाली करणाऱ्या महिलेच्या माध्यमातून हा खरेदी-विक्री व्यवहार सुरू होता. वैशाली ही मूळची मालेगावची रहिवासी आहे. तर दीपाली अनिल दुसिंग (27, रा. सिध्दार्थनगर झोपडपट्टी) आणि रेखा बाळू सोनावणे (32)या तिघिंना अटक केली. यापैकी रेखा सोणवने ही या बालिकेची आई आह. ती रेल्वे स्थानक भागात राहते. या प्रकरणात महात्मा फुले चौक पोलिसांनी किशोर रमेश सोनावणे (34) या रिक्षावाल्याला देख्रील अटक केली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांनी या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला एका बाळाचा कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता खरेदी-विक्रीचा व्यवहार करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांनी खास पथक तयार करून खरेदी-विक्रीचा व्यवहार करणाऱ्यांसाठी सापळा रचला. पोलिसांनी बाळ खरेदीसाठी एक बनावट ग्राहक तयार केला. दलाल महिलेने तिच्याकडे स्त्री जातीचे 42 दिवसांचे बालक असल्याचे सदर बनावट ग्राहकाला सांगितले. ही बालिका पाहिजे असेल तर आपणास चार लाख रूपये द्यावे लागतील. या व्यवहारातील बालक आम्ही कल्याण पश्चिमेतील रामदेव हॉटेलजवळ सहजानंद चौक भागात घेऊन येणार आहोत. त्यानंतर पथकाने त्या भागात सापळा लावला.
बनावट ग्राहकाला लहान बालिका दाखविणे आणि खरेदी-विक्रीचा व्यवहार करत असताना सापळा लावलेल्या पथकाने दलाल महिलेसह इतरांवर झडप घालून त्यांना अटक केली या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. भिक्षेकरी महिलेला पाच वर्षाचा मुलगा, सात आणि नऊ वर्षाच्या दोन मुली असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने ही बाळे ताब्यात घेतली. मुलाला जननी आशीष बालगृहात, तर दोन बहिणींना अंबरनाथ येथील नीला बालसदन येथे ठेवण्यात आले.