Kalyan News : कल्याण RTO ने मिळवला ४३७ कोटींचा विक्रमी महसूल, वर्षभरात १ लाख ८ हजार १२५ वाहनांची नोंदणी

Kalyan News : कल्याण RTO ने मिळवला ४३७  कोटींचा विक्रमी महसूल, वर्षभरात १ लाख  ८ हजार १२५ वाहनांची नोंदणी
Published on
Updated on

ठाणे : कल्याण उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल ४३७ कोटी ८० लाख रुपयांचा विक्रमी महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. वर्षभरात एकूण १ लाख ८ हजार १२५ वाहनांची नोंदणी करण्यात आली.

विशेष म्हणजे, शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा १०० टक्क्यांहून अधिक महसूल वसुली करण्यात कार्यालयाला यश आले आहे, अशी माहिती उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी दिली.

उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्राप्त महसुलामध्ये सर्वाधिक हिस्सा वाहन नोंदणीमधून मिळाला आहे. यामध्ये ७९ हजार ५५७ दुचाकी, १६ हजार ८२६ चारचाकी, ३ हजार ५७१ ऑटोरिक्षा, ४ हजार २९२ मालवाहू वाहने, तसेच प्रवासी व इतर वाहनांचा समावेश आहे.

मागील वर्षाच्या ३७२ कोटी २२ लाख रुपयांच्या महसुलाच्या तुलनेत यंदा तब्बल ४३७ कोटी ८० लाख रुपयांची लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. ही कामगिरी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयपूर्ण मेहनतीचे फलित असून, या यशामुळे कार्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news