Thane News : कल्याणमध्ये दुकानात शिरला अजस्त्र अजगर

प्राणीमित्रांकडून सुरक्षितरीत्या रेस्क्यू
Giant python in shop
कल्याणमध्ये दुकानात शिरला अजस्त्र अजगरpudhari photo
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडे असलेल्या गांधारी रोड परिसरात एका फर्निचरच्या दुकानात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास भला मोठा अजगर शिरल्याची घटना घडली. अचानक समोर आलेल्या या अजस्त्र अजगरामुळे व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली होती. मात्र प्राणीमित्रांच्या समयसूचकतेमुळे या अजगराला कोणतीही इजा न होता सुरक्षितरीत्या रेस्क्यू करण्यात आले आहे.

गांधारी रोडला असलेल्या एका फर्निचरच्या दुकानात रात्री दोन वाजण्याच्या सुमारास तेथे उपस्थित असलेल्या लोकांना अचानक एक मोठा अजगर आढळला. अजस्त्र अजगर पाहून तेथील व्यापाऱ्यांना अक्षरशः घाम फुटला.

Giant python in shop
Welcome New Year : नववर्ष स्वागताला रायगडात लाखो पर्यटकांची तोबा गर्दी

दुकानातील सामानाचा आडोसा घेत हा अजगर आत शिरल्याने त्याला पकडण्याचे मोठे आव्हान होते. रहिवाशांनी तातडीने वॉर फाऊंडेशनचे प्राणी मित्र प्रेम आहेर यांच्याशी संपर्क साधला असता, या प्राणी मित्रांनी अत्यंत शिताफीने या अजगराचा बचाव केला.

वनविभागाच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली लवकरच त्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती प्रेम आहेर यांनी दिली.

Giant python in shop
अवकाळीसह वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news