कल्याणात महिलांसाठी अत्याधुनिक प्रसाधनगृह सज्ज !

Kalyan - Dombivli News | महापालिकेच स्‍तुत्‍य उपक्रम, चेंजिंग रुम, सॅनेटरी पॅड व्हेंन्डिंग मशीन आदी सुविधा मिळणार
Kalyan - Dombivli News
आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते प्रसाधनगृहाचे उद्घाटन करण्यात आले.Pudhari Photo
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या संकल्पनेतून खास महिलांसाठी आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. स्मार्ट वॉशरूम, बेबीकेअर रूम, चेजींग रूम, सॅनेटरी पॅड वेन्डींग मशीनसह फीडींग रूमचा समावेश असलेल्या कल्याण पश्चिमेकडील रेल्वे स्थानक परिसरात उभारण्यात आलेल्या प्रसाधनगृहाचे (Woloo Powder Room) मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

सध्याच्या युगात महिला देखील पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात आपली जबाबदारी लीलया पेलत आहेत. या महिलांच्या सुविधेसाठी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांची संकल्पना प्रत्यक्षात साकार होत आहे. कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या कपोते वाहनतळाच्या आवारात अत्याधुनिक व सुसज्ज असे प्रसाधनगृह महिलांच्या सेवेत दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी या प्रसाधनगृहाचे लोकार्पण आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर प्रसाधनगृह ग्लोबल स्टार टॉयलेट मानांकन प्राप्त असून यामध्ये महिलांसाठी स्वच्छ शौचालय आणि त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. प्रसाधनगृहात 4 स्मार्ट वॉशरूम, बेबीकेअर रूम, चेजींग रूम, सॅनेटरी पॅड वेन्डींग मशीनसह फीडींग रूमचा समावेश आहे. स्वच्छता व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने इंटरनेट ऑपरेटींग सिस्टिम बसविण्यात आली आहे. या प्रसाधनगृहात महिलांची स्वच्छता, सुरक्षितता, वैयक्तीक काळजी घेण्यासह महिलांसाठी सौंदर्य प्रसाधने देखील ठेवण्यात आली आहेत. हे प्रसाधनगृह साकारण्यासाठी केडीएमसीच्या शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे आणि उपअभियंता योगेश गोटेकर यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news