Kalyan Crime | कल्याणमध्ये मांस तस्करांचा थरारक पाठलाग; कार सोडून टोळके पसार

बाजारपेठ पोलिसांकडून २.१५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Kalyan police smugglers chase
Kalyan police smugglers chase Pudhari
Published on
Updated on

Kalyan meat smugglers

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडील कोळीवाडा परिसरात दोन प्राण्यांची कत्तल करून त्यांचे मांस कारमध्ये भरून तस्करी करणाऱ्या पाच जणांच्या टोळक्याने हे मांस अन्यत्र वितरित करण्याचा प्रयत्न केला. मात्र बाजारपेठ पोलिसांनी थरारक पाठलाग करत तस्करांचा मनसुबा उधळून लावला. तस्करांनी कार सोडून पळ काढला. पोलिसांनी या प्राण्यांचे मांस भरलेल्या कारसह २ लाख १५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या प्रकरणी हवालदार सुशील तरवडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार पसार झालेल्या पाच सराईत गुन्हेगारांविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. शहाबाज इस्माईल शम्सी उर्फ गोरू, सुरज खैरीराम कायरिया उर्फ बारक्या, इब्राहिम इस्माईल मजिद उर्फ पापा हड्डी आणि इतर दोन अशी गुन्हा दाखल झालेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. घटनास्थळावरून प्राण्यांच्या ६० किलो वजनाच्या मांसासह कार असा एकूण २ लाख १५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

शनिवारी पहाटेच्या सुमारास बाजारपेठ पोलिस आपल्या हद्दीत गस्त घालत होते. इतक्यात पोलिसांना एका जागरूक रहिवाशाने माहिती दिली. कल्याण पश्चिमेकडे असलेल्या कोळीवाडा मैदानाजवळच्या अमृत पाम्स इमारतीच्या पाठीमागे एका कारमधून दोन प्राण्यांची कत्तल करून त्यांचे मांस तस्करीसाठी आणले असल्याची पक्की खबर मिळताच पोलिस तात्काळ सदर ठिकाणी पोहोचले. तेथे एक कार उभी होती. सदर कारभोवती पाच इसम आढळून आले. पोलिसांना पाहताच पाचही इसमांनी कार सोडून पळ काढला. त्यातील गोरू, बारक्या आणि पापा हड्डी हे तिघेजण पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली.

चोरलेल्या जनावरांची कत्तल केल्याचा संशय

पोलिसांनी टोळक्याचा पाठलाग केला. तथापी अंधार आणि गल्लीबोळाचा फायदा घेऊन ते पाच जण पसार होण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यात दोन प्राण्यांची कत्तल केलेले मांस आढळून आले. पोलिसांनी अन्य सहकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून कारसह प्राण्यांचे ६० किलो वजनाचे मांस जप्त केले. पाच जणांच्या टोळक्याने कल्याणच्या बाहेर अज्ञात ठिकाणी जनावरांची चोरी करून त्यांची बाहेरच कत्तल करून ते मांस कारमधून शहरात विक्री करण्यासाठी आणले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास चक्रांना वेग दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news