Kalyan Crime : एकीने आईला लाईव्ह लोकेशन पाठवले अन् चार मुलींची कल्याणमधून सुटका

कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या द्वारली गावठाण परिसरातील एका घरात जबरदस्तीने चार अल्पवयीन मुलींना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
Kalyan Four Minor Girls Confined
Kalyan Four Minor Girls Confined AI Photo
Published on
Updated on

Kalyan Four Minor Girls Confined

डोंबिवली : कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या द्वारली गावठाण परिसरातील एका घरात जबरदस्तीने चार अल्पवयीन मुलींना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यातील एका अपहृत मुलीने प्रसंगावधान दाखवत आईला लाईव्ह लोकेशन पाठवले आणि हा प्रकार उजेडात आला आहे. कोळसेवाडी पोलिसांनी तत्परता दाखवत मुलींचे अपहरण करणाऱ्या मुख्य अपहरणकर्त्याला ताब्यात घेतले आहे.

काही दिवसांपूर्वी एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. सुरूवातीला ती मैत्रिणीकडे किंवा नातेवाईकांकडे गेली असावी, असा कुटुंबीयांचा कयास होता. मात्र ती परत न आल्याने कुटुंबीय चिंतेत होते. याच दरम्यान त्या बेपत्ता मुलीने धाडसाने मोबाईलच्या माध्यमातून आपल्या आईशी संपर्क साधला. एक तरूण आपल्याला त्रास देत असून द्वारली येथील एका बंद घरात जबरदस्तीने डांबून ठेवल्याची माहिती तिने आईला दिली.

Kalyan Four Minor Girls Confined
Kalyan Shil Road traffic : कल्याण-शिळ मार्ग नेहमीचाच ‘जाम’; कामगार, विद्यार्थ्यांना रोजचाच ‘लेटमार्क’

तसेच आपण कशीतरी त्या घराच्या खिडकीतून बाहेर पडून एका इमारतीखाली लपल्याचे सांगत तिने मदतीची याचना केली. मुलीचा हा मेसेज आणि तिची अवस्था समजताच आईने तिला लाईव्ह लोकेशन पाठविण्यास सांगितले. त्यानंतर आपत्कालीन मदत क्रमांक ११२ वर फोन करून पोलिसांना या गंभीर प्रकाराची माहिती दिली. माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांचे पथक आणि मुलीचे नातेवाईक तातडीने संबंधित ठिकाणी पोहोचले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई करत अपहृत मुलीसह अन्य तीन अशा एकूण चार अल्पवयीन मुलींची सुखरूप सुटका केली. या मुलींचे अपहरण करून त्यांना घरात डांबून ठेवल्याच्या संशयावरून पोलिसांनी चेतन माने नावाच्या तरूणाला ताब्यात घेतले आहे.

Kalyan Four Minor Girls Confined
Kalyan dog bite : श्वानदंशाचा आकडा फुगवला; डॉक्टरांची अखेर कबुली!

प्राथमिक तपासात समोर आले आहे की चेतन माने याच्यावर यापूर्वीही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे गंभीर गुन्हे विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. या घटनेमुळे कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या द्वारली परिसरातील पालकांसह स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या मुलींना नेमके कोणत्या कारणासाठी डांबून ठेवण्यात आले होते ? या काळात त्यांच्यावर आणखी काही अत्याचार झाले आहेत का ? याचा उलगडा करण्यासाठी कोळसेवाडी पोलिसांनी तपास चक्रांना वेग दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news