Kalyan big news | कल्याणमध्ये मोठी ड्रग्ज कारवाई : ३४ कोटींचे ९.७ किलो वजनाचे हेरॉईन जप्त! पोलिसांनी केले रॅकेट उद्ध्वस्त

मोका गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अमजद पठाणसह ५ बदमाशांना ठोकल्या बेड्या
 ३४ कोटींचे ९.७ किलो वजनाचे हेरॉईन जप्त! पोलिसांनी केले रॅकेट उद्ध्वस्त
३४ कोटींचे ९.७ किलो वजनाचे हेरॉईन जप्त! पोलिसांनी केले रॅकेट उद्ध्वस्त
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण परिमंडळ ३ च्या अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकाने ठाणे जिल्ह्याला हादरवून सोडणारी कारवाई केली आहे. कल्याणच्या सांगळेवाडी स्मशानभूमीजवळ सापळा रचून पथकाने एकूण ९ किलो ७६८ ग्रॅम वजनाची, ३४ कोटी १८ लाख ८४ हजार रूपये किंमतीची हेरॉईन (गर्द) जप्त केली आहे. या कारवाईत मुख्य पुरवठादार तथा सराईत गुन्हेगार अमजद युसुफ पठाण यासह एकूण ५ जणांचे पेकाट मोडून काढण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा हेरॉईनचा साठा असल्याचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दावा केला आहे.

   अमजद युसुफ पठाण (४७, रा. बैलबाजार, कल्याण), कासिम अब्दुल सत्तार वसईकर (३८, रा. शाहपूर), कृष्णा नागप्पा हळेमणी (३६, रा. सायन कोळीवाडा, मुंबई), गणेशन पुथुस्वामी जंगमार उर्फ अण्णा (७१, सायन कोळीवाडा, मुंबई) आणि सद्दाम गफुर शेख (३२, रा. बैलबाजार, कल्याण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

   पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक होनमाणे यांच्या मार्गदर्शनानुसार अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकाचे प्रमुख सपोनि अनिल गायकवाड, पोउपनि जितेंद्र ठोके, हवा. सदाशिव देवेरे, राहूल शिंदे, अमित शिंदे, आकाश बिरपन, प्रवीण खांडेकर आणि अनिल खरसाण हे पथक  बुधवारी १ एप्रिल रोजी कल्याण परिसरात गस्त घालत होते. सकाळी ७:२०च्या सुमारास सांगळेवाडी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन संशयित इसम पाठीवर बॅग घेऊन जाताना आढळले.

पोलिसांना पाहताच ते पळून जाऊ लागले. मात्र पथकाने थरारक पाठलाग करत त्या दोघांना पकडले. चौकशी दरम्यान त्यांनी आपली नावे कासिम अब्दुल सत्तार वसईकर (३८, रा. शाहपूर), कृष्णा नागप्पा हळेमणी (३६, रा. सायन कोळीवाडा, मुंबई) असल्याचे सांगितले. झडती घेतली असता त्यांच्याकडील बॅगमध्ये ९ किलो २३६ ग्रॅम हेरॉईन आढळून आली, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ३२ कोटी ३२ लाख ६० हजार रूपये इतकी आहे. शिवाय त्यांच्याकडून ३९ हजार रूपयांची रोकडही जप्त करण्यात आली. महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात या प्रकरणी अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमचे कलम ८ (क), २२ (क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे कल्याण-डोंबिवलीतील ड्रग्ज तस्करीच्या साखळीला मोठा धक्का बसला आहे.

 ३४ कोटींचे ९.७ किलो वजनाचे हेरॉईन जप्त! पोलिसांनी केले रॅकेट उद्ध्वस्त
३४ कोटींचे ९.७ किलो वजनाचे हेरॉईन जप्त! पोलिसांनी केले रॅकेट उद्ध्वस्त

घरझडतीत आणखी दीड किलोचा साठा हस्तगत

कासिम वसईकरच्या शाहपूर येथील घराची झडती घेतली असता तिथून आणखी ५३१.६९ ग्रॅम हेरॉईन मिळाली, ज्याची किंमत १ कोटी ८५ लाख ८५ हजार रूपये इतकी आहे. अशा प्रकारे एकूण ९ किलो ७६८ ग्रॅम वजनाचा साठा जप्त झाला.

मुख्य सूत्रधार अमजद पठाण : २० गंभीर गुन्ह्यांसह मकोका

तपासात या संपूर्ण रॅकेटचा मुख्य पुरवठादार अमजद युसुफ पठाण (४७, रा. बैलबाजार, कल्याण) असून सध्या तो नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमध्ये राहत असल्याचे निष्पन्न झाले. त्याने ही हेरॉईन मुंबईच्या सायन कोळीवाड्यातील ७१ वर्षीय गणेशन पुथुस्वामी जंगमार उर्फ अण्णा याला विक्रीसाठी दिली होती. अमजद पठाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी, खून, अंमली पदार्थ विरोधी कायदा, शस्त्रास्त्र कायदा आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत एकूण २० गंभीर गुन्हे दाखल आहेत. कासिम वसईकर आणि सद्दाम गफुर शेख हे दोघे अमजदचा माल किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत होते.

पोलिसांनी गणेशन अण्णाला ५ एप्रिलला, सद्दाम शेखला ६ एप्रिलला आणि मुख्य आरोपी अमजद पठाणला २१ मे रोजी बेड्या ठोकल्या आहेत. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अमजद पठाण याला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी १ जून पर्यंत १० दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

गुन्हेगारांची पार्श्वभूमी : खून, मकोका, अंमली पदार्थ कायदा

अमजद पठाण याच्यावर खून (कलम ३०२), मकोका, राजस्थान-मध्य प्रदेशात अंमली पदार्थ कायद्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर भिवंडी येथेही मकोका लागला आहे. कासिम वसईकर यापूर्वीही अंमली पदार्थ कायद्याचे ३ गुन्हे दाखल. सद्दाम शेखवर चोरी, जबरी चोरीचे ७ गुन्हे दाखल आहेत.

वरिष्ठांकडून पथकाचे कौतुक

जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलिस आयुक्त संजय जाधव यांनी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहायक आयुक्त अशोक होनमाणे यांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकाचे प्रमुख सपोनि अनिल गायकवाड, पोउपनि जितेंद्र ठोके, हवा. सदाशिव देवेरे, राहूल शिंदे, अमित शिंदे, आकाश बिरपन, प्रवीण खांडेकर आणि अनिल खरसाण यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news