Kalyan Dombivli Rainfall | अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील सर्व शाळांना 6 जुलै रोजी सुट्टी जाहीर

Holiday for 139 schools
प्रातिनिधी छायाचित्रFile Photo
Published on
Updated on

डोंबिवली : हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यम आणि सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उद्या सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

    या संदर्भात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना परिपत्रक काढले आहे. अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेस धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे. शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी भारत बोरनारे यांनी स्वाक्षरी केलेल्या या पत्रात सर्व मुख्याध्यापकांनी पालकांना तात्काळ माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तसेच सकाळच्या सत्रातील विद्यार्थी शाळेत आल्यास त्यांना सुखरूप घरी नेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. हे पत्र ठाणे जिल्हाधिकारी, मुंबईचे विभागीय उपसंचालक, केडीएमसीचा शिक्षण विभाग आणि जिल्हापरिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आले आहे. त्यामुळे उद्या सोमवारी कल्याण-डोंबिवली परिसरातील सर्व शाळा बंद राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news