Kalyan Burglary Gang: प्राण्यांचा मास्क लावून फिरणारी टोळी सक्रिय

काटेमानिवलीतील बंद घर फोडून साडेपाच तोळे सोने लंपास
Kalyan Burglary Gang
Kalyan Burglary GangPudhari
Published on
Updated on

डोंबिवली: कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात चोऱ्या/घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारांनी नव्या क्लृप्तीचा अवलंब केल्यामुळे रहिवाश्यांसह पोलीसही अवाक्‌‍ झाले आहेत. चेहऱ्याला प्राण्यांचे मुखवटे लावून चोऱ्या/घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांच्या सराईत टोळीने पोलिसांना खुले आव्हान दिले आहे.

विशेष म्हणजे चारचाकी वाहनांतून फिरणाऱ्या या टोळीने आता कल्याण पूर्वेकडे असलेल्या काटेमानिवलीतील एका बंद घराला लक्ष्य केले. घराचा कडी-कोयंडा तोडून या टोळीने कपाटातील जवळपास साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. एकीकडे एका इमारतीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चेहऱ्याला प्राण्याचा मुखवटा लावलेला चोरटा कैद झाला आहे. तर दुसरीकडे या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Kalyan Burglary Gang
Raigad Crime | दारू पिण्यास मज्जाव केल्याने चायनीज सेंटर चालक व कर्मचाऱ्यांना मारहाण

कल्याण पूर्वेकडे असलेल्या काटेमानिवली नाका परिसरातील रॉयल गोल्ड पॅलेसमध्ये राहणारे गजानन तानाजी पाताडे हे त्यांच्या कुटुंबासह 4 मे रोजी गावी गेले होते. घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास पाताडे यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील तिजोरी वाकवून त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले.

चोरट्यांनी या घरफोडीत एकूण 2 लाख 54 हजार रूपये किमतीचे दागिने लांबविले आहेत. विशेष म्हणजे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्वतःची ओळख पटू नये, यासाठी हे चोरटे चेहऱ्याला प्राण्यांचे मास्क लावून वावरत असल्याचे समोर आले आहे. मास्कधाऱ्याची संशयास्पद हालचाल पाहिल्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ घरमालक गजानन पाताडे यांना फोनवरून याची कल्पना दिली, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.

या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तोडकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सापते यांनी या टोळीचा छडा लावण्यासाठी तपासचक्रांना वेग दिला आहे. ज्या काटेमानिवली नाका परिसरातील रॉयल गोल्ड पॅलेस इमारतीत मास्कधारी चोरटा आढळून आला त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या मास्कधारी टोळीचा शोध घेतला जात आहे.

Kalyan Burglary Gang
Thane Crime: कळव्यात भूमाफियाचा कुटुंबावर धारदार चाकूने हल्ला; महिलेला भोसकले, तीन गंभीर

रहिवाशांना पोलिसांचे आवाहन

रात्रीच्या सुमारास कुणालाही संशयास्पद चारचाकी वाहन किंवा मास्क घातलेली व्यक्ती आढळल्यास तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी किंवा नियंत्रण कक्षाशी 0251-2313427, 0251-2315446 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news