Kalyan Dombivli Fire Incidents: कल्याण-डोंबिवलीत ७ तासांत ७० आगीच्या घटन

६८ आगी फटाक्यांमुळे, इमारती, झाडे आणि वाहनांचे नुकसान
Kalyan Dombivli Fire Incidents
Kalyan Dombivli Fire IncidentsPudhari
Published on: 
Updated on: 

कल्याण: दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी करताना थोडीशी निष्काळजी किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय कल्याण-डोंबिवलीकरांना आला आहे. लक्ष्मीपूजनाच्या रात्री फटाक्यांच्या रॉकेटमुळे शहरात आगीच्या घटनांचा अक्षरशः भडका उडाला.

८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ ते रात्री २ या अवघ्या सात तासांत कल्याण-डोंबिवलीत तब्बल ७० आगीच्या घटना घडल्या. यापैकी ६८ आगी फटाक्यांमुळे लागल्याची धक्कादायक माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.

Kalyan Dombivli Fire Incidents
Bhiwandi fire Incident: भिवंडीत लक्ष्मीपूजनानंतर रात्रभरात 12 आगीच्या घटना; आगीत लाखो रुपयांचे नुकसान

कुठे गृहसंकुलाच्या गॅलरीला आग लागली, तर कुठे निर्माणाधीन इमारतीचे बांधकाम साहित्य जळून खाक झाले. झाडे आणि वाहनांनाही आगीची झळ बसली. विशेष म्हणजे, रॉकेटमुळे सर्वाधिक आगी लागल्याचे समोर आले आहे. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दिवाळीच्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे कल्याण-डोंबिवलीत आगीच्या घटनांनी चिंता वाढवली आहे. डोंबिवली पूर्वेतील ९० फूट रोडवरील मंगेशी डेझेल फेज ३ गृहसंकुलाच्या सहाव्या मजल्यावरील एका फ्लॅटच्या गॅलरीला भीषण आग लागली. फटाक्यांमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.

तर कल्याण पूर्वेतील चिंचपाडा रोडवरील गणेश टेकडी येथील श्री दर्शन रिकन्स्ट्रक्शन या निर्माणाधीन इमारतीला मध्यरात्री आग लागली. या आगीत बांधकामासाठी वापरण्यात आलेले बांबू आणि सेंटरिंगच्या लाकडी फळ्या जळून खाक झाल्या. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला दोन ते तीन तास प्रयत्न करावे लागले.

डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे ग्राउंड परिसरात उभ्या असलेल्या एका वाहनालाही भीषण आग लागली. या घटनेमुळे मैदानात उपस्थित नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दुसरीकडे, कल्याणमधील गांधारी नवीन रोड परिसरात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे काही झाडांनी पेट घेतला. इतर झाडांना आग लागू नये म्हणून स्थानिकांनी रात्री सव्वा एक वाजता अग्निशमन दलाला फोन केला; मात्र फोन उचलला नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.

मात्र, या चार मोठ्या घटनांपुरतीच आगीची मालिका मर्यादित नव्हती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ ते रात्री २ या सात तासांत एकूण ७० आगीच्या घटना घडल्या. त्यापैकी ६८ आगी फटाक्यांमुळे, तर दोन आगी इतर कारणांमुळे लागल्या.

विशेष म्हणजे, रॉकेट कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर किंवा इमारतींच्या गॅलरीत पडल्याने तेथे ठेवलेल्या कागद आणि कपड्यांनी पेट घेतल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे.

Kalyan Dombivli Fire Incidents
Thane Building Fire: आग लागलेल्या रहेजा कार्लाइन इमारतीतून 50 रहिवाशांची केली सुखरूप सुटका; ७ मजल्यांचे नुकसान

कल्याण पश्चिमेत सर्वाधिक १९ आगींची नोंद झाली

कल्याण पश्चिमेत सर्वाधिक १९ आगींची नोंद झाली. कल्याण पूर्वेत १२, डोंबिवली पूर्व एमआयडीसी परिसरात १५, तर डोंबिवली पश्चिमेत ११ आगी लागल्या. उर्वरित घटनांची नोंद इतर अग्निशमन केंद्रांच्या हद्दीत झाली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेत घटनास्थळी पोहोचून सर्व आगींवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. फटाके फोडताना मैदानाचा वापर करावा आणि रॉकेट उडवणे टाळावे, असे आवाहनही मुख्य अग्निशमन दल अधिकारी नामदेव चौधरी यांनी केले आहे. त्यामुळे दिवाळीचा आनंद साजरा करताना दुसऱ्यांच्या मालमत्तेचे आणि पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.