Kalyan Crime | ब्रेकअप् झाल्याने प्रियकराने प्रेयसीच्या घराला लावली आग: आरोपी प्रियकराला ३ दिवसांची पोलिस कोठडी!

कुटुंबाकडून कठोर शिक्षेची मागणी : पोलिसांकडून जुन्या मेसेजची तपासणी 
आरोपी दीपेश रस्तोगी याला बंदाबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले
आरोपी दीपेश रस्तोगी याला बंदाबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले
Published on: 
Updated on: 

डोंबिवली : प्रेयसीच्या घराला आग लावल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी दीपेश रस्तोगी याला कल्याण न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मानपाडा पोलिसांनी आरोपीला कडक सुरक्षेत कल्याण न्यायालयात हजर केले होते. आग लावण्यासाठी वापरलेले साहित्य, घटनेमागील संपूर्ण कट आणि आणखी एका प्रकरणात चौकशी करायची असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. 

   आरोपी दीपेश याला कठोरात कठोर शिक्षा देण्याची कुटुंबियांनी मागणी केली आहे. कुटुंबाचे म्हणणे आहे की, ब्रेकअप झाल्यापासून दीपेश सातत्याने तरूणीला त्रास देत होता. फोनवरून धमक्या देत होता आणि घराजवळ घुटमळत होता. कुटुंबाने पोलिसांना काही जुने मेसेज आणि कॉल रेकॉर्डही सोपवले आहेत. पोलिस आता त्याची तपासणी करत आहेत.

आरोपी दीपेश रस्तोगी याला बंदाबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले
Dombivli House Fire Case: ब्रेकअपचा रागातून प्रियकराने प्रेयसीचे घर पेटवले; तरूणीसह आई-वडिल थोडक्यात बचावले

  पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी रात्री सुमारे २ वाजता घराजवळ पोहोचताना दिसत आहे. त्याच्या हातात एक बाटली आणि कापड होते. आग लावल्यानंतर तो तेथून वेगाने पळून गेला. पोलिसांनी फुटेज जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहे. या संदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी सांगितले की, सध्या आरोपीला आणखी एका दुसऱ्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.