कल्याण इमारत दुर्घटनेतील सहा मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा

Thane News : सहा जखमी तर सहा जणांचा मृत्यू; तहसिलदार कार्यालयाकडून अहवाल सादर
CM compensation announcement
pudhari photo
Published on
Updated on

ठाणे : कल्याण शहरातील कल्याण (पूर्व) चिकणीपाडा येथील सप्तशृंगी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या पाच मजली निवासी इमारतीमधील चौथ्या मजल्यावर फरशी बसविण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना चौथ्या मजल्याचा स्लॅब खाली कोसळला आणि ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकूण ६ व्यक्ती जखमी झाल्या असून ६ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती तहसिलदार सचिन शेजाळ यांनी दिली आहे.

तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, कल्याण यांनी दिलेल्या अहवालानुसार, ही घटना २० मे रोजी दुपारी २.०० वाजताच्या सुमारास घडली. ही दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तात्काळ मदत व बचाव कार्य सुरू केले. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनेची माहिती घेऊन इमारतीमधील सर्व रहिवाशांना स्थलांतरित करून जखमी आणि मृतांच्या वारसांना आपत्ती निवारण निधीतून आर्थिक मदत देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

त्याचबरोबर घटनेनंतर प्रशासनाकडून तातडीने पंचनामा करण्यात आला असून, जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

घटनास्थळावरील शोध कार्य पूर्ण झाले असून इमारतीतील नागरिकांना जवळील ज्ञानमंदिर विद्यालय, कल्याण (पूर्व) येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे त्या सर्वांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळाल्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेतील मृत सहा नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना शासनातर्फे पाच लाखांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.

जखमी व्यक्तींची यादी:

१: अरुणा रोहिदास गिरनारायण (महिला, ४८ वर्षे) - अमेय हॉस्पिटल

२: यश जितेंद्र क्षीरसागर (मुलगा, १३ वर्षे) - चैतन्य हॉस्पिटल

३: निखिल खरात (पुरुष, २६ वर्षे) - चैतन्य हॉस्पिटल

४: विनायक मनोज पार्धी (मुलगा, ४.५ वर्षे) - आशिर्वाद हॉस्पिटल.

५: श्रावील श्रीकांत शेलार (मुलगा, ४.३ वर्षे) - आशिर्वाद हॉस्पिटल

६: श्रद्धा साहू (महिला, १४ वर्षे) - रुक्मिणीबाई हॉस्पिटल

मृत व्यक्तींची यादी

१: सुशिला नारायण गुजर (महिला, ७८ वर्षे) - चैतन्य हॉस्पिटल

२: कु.नामस्वी श्रीकांत शेलार (महिला, १.५ वर्षे) - आशिर्वाद हॉस्पिटल

३: व्यंकट चव्हाण (पुरुष, ३२ वर्षे) - घटनास्थळी

४: सुनिता निरंजन साहू (महिला, ३८ वर्षे) - चैतन्य हॉस्पिटल

५: प्रमिला कालीचरण साहू (महिला, ५६ वर्षे) - चैतन्य हॉस्पिटल

६: .सुजाता मनोज पाडी (महिला, ३२ वर्षे) - घटनास्थळी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news