Kalu Dam Project Issue: मुरबाड तालुक्यातील काळू धरणात बोगस प्रकल्पग्रस्तांची घुसखोरी रोखणार कोण?

चासोळे ग्रामपंचायत हद्दीत श्रीमंतांच्या झोपड्या; 10 ते 15 लाखांत घरपट्टी व्यवहारांची चर्चा
Kalu Dam Project Issue
Kalu Dam Project IssuePudhari
Published on
Updated on

किशोर गायकवाड

मुरबाड शहर: मुरबाड तालुक्यातील प्रस्तावित काळू धरण प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रात कथित बोगस घरपट्टी प्रकरणांबाबत विविध चर्चा रंगू लागल्या असून, काही ठिकाणी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप स्थानिक स्तरावरून पुढे येत आहेत.

एकीकडे प्रकल्पबाधित शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थ न्यायासाठी संघर्ष करत असताना, दुसरीकडे बाहेरील काही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींनी बाधित क्षेत्रात झोपड्या व घरे उभारून स्थानिक रहिवासी असल्याचा दावा केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

Kalu Dam Project Issue
Alibaug News: स्वतःच्या पैशातून सुरू विद्यार्थ्यांची तपासणी; राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांची व्यथा

चासोळे ग्रामपंचायत हद्दीत सुमारे 350 घरपट्ट्यांची नोंद असल्याचे ग्रामपंचायत दप्तरी दिसून येत असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात येत आहे. मात्र यामधील प्रत्यक्ष स्थानिक ग्रामस्थांची संख्या किती, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत.

प्रकल्पाचे अधिसूचना (नोटिफिकेशन) जाहीर झाल्यानंतर बाधित क्षेत्रातील जमीन खरेदी-विक्री तसेच नवीन घरपट्टी मंजुरीवर निर्बंध लागू होतात, असा सर्वसाधारण नियम आहे. मात्र गेल्या काही वर्षांत चासोळे परिसरात काही जमीन व्यवहार झाल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Kalu Dam Project Issue
Dombivli Gaming Zone Issue: डोंबिवलीतील ऐतिहासिक 52 चाळ रेल्वे मैदानावरील गेमिंग झोनच्या कामाला स्थगिती

तसेच काही बाहेरील व्यक्तींनी कथितरीत्या स्थानिक पातळीवर आर्थिक व्यवहार करून घरपट्ट्या मिळवल्याचे आरोप देखील समोर येत आहेत. या आरोपांची अधिकृत पातळीवर पुष्टी झालेली नाही.

काही ठिकाणी केवळ स्टॅम्प पेपरवर जागा हस्तांतरण करून त्यावर झोपड्या उभारण्यात आल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. एका व्यक्तीच्या मालकीच्या जागेवर दुसऱ्या व्यक्तींच्या नावाने घरे दाखवण्यात आल्याचे दावेही काही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहेत. मात्र या सर्व बाबींची शासकीय तपासणी होणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news