

उल्हासनगर : उल्हासनगरच्या स्थानिक राजकारणात मोठा उलथापालथ करत टीम ओमी कलानी समर्थक पदाधिकारी व माजी नगरसेवकानी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात भाजप प्रवेश केला. त्यांनी महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपचा झेंडा हाती घेतला.
भाजपमध्ये दाखल झालेल्या टीओके समर्थकांमध्ये प्रभुनाथ गुप्ता, बाबू गुप्ता, संजय सिंग, मंगल वाघे, छाया सुजित चक्रवर्ती, हेमा पिंजानी, सुचित्रा सिंह, सूरज भारवाणी, किशन लचानी, चांदनी श्रीवास्तव, मनीषा मेथवानी तसेच दशरथ खैरनार यांसारखी दिग्गज नावे सामील होती. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेश वधर्या म्हणाले की भाजप हा एकमेव पक्ष आहे जो जनसेवा व विकासाची राजकारण करतो. यामुळे भविष्यात उल्हासनगर शहराचा महापौर हा भाजपचा होईल.
या प्रसंगी उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी, जिलाध्यक्ष राजेश वधर्या यांच्यासह महेश सुखरमानी, जमनू पुरस्वानी, प्रकाश माखीजा, प्रदीप रामचंदानी, प्रशांत पाटील, राजू जग्यासी, राम पारवानी, जिल्हा महासचिव अमित वाधवा, उल्हासनगर शॉपकीपर्स असोसिएशनचे अध्यक्ष दीपक छतलानी, मनोज साधनानी यांच्यासह इतर अनेक भाजप पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टीओकेच्या भाजप प्रवेशाला राजकीय जाणकार उल्हासनगरमधील सत्ता समीकरणात मोठा बदल मानत आहेत. हा निर्णय भाजपसाठी केवळ संघटनात्मक बळकटीचे चिन्ह नाही, तर आगामी निवडणुकांत पक्षाला निर्णायक आघाडी मिळवून देण्यासाठीही उपयुक्त ठरणार असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.