Jitendra Awhad Threat Case: आव्हाडांना धमकी देणाऱ्याला पुण्यात अटक; टीव्हीवर बातमी पाहताच घरमालकाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले

टीव्हीवरील बातमी पाहून घरमालकाला भाडेकरूवर संशय; लोणीकंद पोलिसांकडून विशाल बिच्चेवार ताब्यात, ठाणे पोलिसांची चौकशी सुरू
Jitendra Awhad Threat Case
Jitendra Awhad Threat CasePudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांना फोन आणि व्हॉट्सॲप संदेशाद्वारे गोळ्या घालण्याची धमकी दिल्याप्रकरणी संशयित विशाल माधवराव बिच्चेवार याला पुण्यातील लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टीव्हीवर धमकीच्या प्रकरणाची बातमी पाहताच घरमालकाला आपल्या भाडेकरूबाबत संशय आला. त्याने विशालला पकडून थेट लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात दिले.

त्यानंतर ठाणे पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले असून, संशयिताला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. विशाल हा सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांना १८ ऑक्टोबर रोजी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.

Jitendra Awhad Threat Case
Pradeep Purnekar case: हत्याराच्या शोधार्थ पोलीस टीम टल्लीसह कर्नाळा जंगलात

संबंधित व्यक्तीने आव्हाड यांच्या मोबाईलवर फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. तक्रारदार हेमंत वाणी यांनी संबंधित व्यक्तीशी संवाद साधला असता, आव्हाड यांना तीन गोळ्या घालण्याची तसेच वाणी यांनाही गोळी मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय, आव्हाड यांना व्हॉट्सॲप संदेश पाठवून त्यांच्या निवासस्थानी आल्याचा उल्लेखही करण्यात आला होता. या धमकी प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

वर्तकनगर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तपास सुरू केला असतानाच पुण्यातील लोणीकंद परिसरात संशयिताचा माग काढण्यात महत्त्वाचा धागा मिळाला. धमकी प्रकरणाची बातमी टीव्हीवर पाहणाऱ्या घरमालकाला आपल्या घरी भाड्याने राहणारा विशाल बिच्चेवार याच्याबाबत संशय आला. त्यानंतर त्याने विशालला पकडून लोणीकंद पोलीस ठाण्यात आणले.

Jitendra Awhad Threat Case
Kalyan Namdevwadi Road: कल्याणात नामदेववाडी ते पुनालिंक रोड २५ वर्षांपासून अपूर्णच

संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ठाणे पोलिसांचे पथक लोणीकंद येथे पोहोचले. पथकाने विशालचा ताबा घेत त्याला नोटीस बजावली असून, धमकी प्रकरणातील त्याची नेमकी भूमिका आणि धमकीमागील कारण याबाबत चौकशी सुरू केली आहे.

या प्रकरणात पुणे पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसून, ठाणे पोलिसांच्या तपासानंतरच धमकीमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news