

ठाणे : ठाणे शहर हे मुंबई शहराच्या लगतचे शहर आहे. त्यामुळे ठाण्यात आजच्या स्थितीला ड्रग्ज तस्करांचा अड्डा झाल्याची परिस्थिती आहे. मात्र 2024 या वर्षात ड्रग्ज माफियांचे कंबरडे मोडण्याचा यशस्वी प्रयत्न ठाणे पोलीस आणि गुन्हे शाखेने केलेला आहे. तर रस्त्यावरील पुरुष-महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचणार्या इराणी टोळीचा ही बंदोबस्त ठाणे पोलिसांनी केला असला तरीही घटना घडताच आहेत. त्यामुळे ठाणे पोलिसांना सोनसाखळी, महागडे मोबाईल, चोरट्यांचे आव्हान असल्याचे दिसत आहे.
ठाणे हे ड्रग्ज माफियांचे केंद्रबिंदू आहे. ड्रग्ज माफियांचे टार्गेट असलेले शहर आहे. ठाण्यात मुंब्रा आणि भिवंडी परिसरात ड्रग्ज माफियांचे मोठे नेटवर्क पसरलेले असल्याने या परिसरात दृग्ज तस्कर सेवनार्थीना ड्रग्ज पुरवितात. ठाणे शहरातही गुन्हे शाखा युनिट-5 ने अनेक ड्रग्ज तस्कराना अटक केलेली आहे. तर तस्करांमध्ये मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिकांचा समावेश आहे. ड्रग्ज तस्करीत नायजेरियन नागरिक हे अग्रेसर आहेत. तर लोकल तस्कर हे मात्र अमली पदार्थ नशेडीपर्यंत पोहचवीत असल्याने ठाणे पोलिसांनी सेवनार्थी यांच्यावर कारवाई केली. तर दुसरीकडे ड्रग्ज तस्करी हि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात होणार असल्याची शक्यता आहे. त्यांचा बंदोबस्त ठाणे पोलीस करीत आहेत. ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील दिवा परिसरात मोठ्या प्रमाणात नायजेरियन राहत होते. त्यामुळे अमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी नायजेरियन नागरिकाला ठाणे सोयीचे पडत होते. अन तस्करीचे प्रमाण वाढलेले होते. मात्र एका नायजेरियन नागरिकांची 5 वर्षांपूर्वी हत्या झाल्यानंतर नायजेरियन तस्करांना दिवा हे असुरक्षित वाटू लागल्याने तस्करीच्या धंद्यातील नायजेरियन यांनी मुंबई व अन्य ठिकाणी आश्रय घेतला. तरीही आजही नायजेरियन तस्करांची संख्या मोठी आहे. ठाण्यात ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या नायजेरियन तस्कराला गुन्हे शाखेच्या पथकांनी अनेकवेळा मुसक्या आवळल्या आहेत. मात्र 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या दरम्यान होणार्या पार्ट्या, रेव्ह पार्ट्या मध्ये ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात होत असतो.
ठाण्यात येणार्या ड्रग्जचे केंद्रीय स्थान शोधून ठाणे पोलिसांनी उत्तरप्रदेश, रायगड येथील केंद्रे उध्वस्त केलेली आहेत.
अंमली पदार्थात नव्या नशेचा उदय हॅश ऑइल आणि हायब्रीड गांजा मोठ्या प्रमाणात गुन्हे शाखा युनिट-5 ने जप्त केलेला आहे.
यंदाच्या वर्षात जयेश कांबळी आणि विघाणेश शिके यांच्याकडून 15 फेब्रुवारी, 2024 रोजी 78.8 ग्राम एमडी पावडर हस्तगत केली.
2024 या वर्षात कारवाईत ठाणे पोलिसांनी 220 किलोग्रॅम गमजा, 10 किलो चरस, 7 किलो एमडी हस्तगत करून 44 जणांना अटकही केली होती.
भिवंडी आणि ठाण्यात मुंब्रा परिसर हे तस्करांचे लागेबांधे असल्याचे अनेकवेळा उघड झालेले आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, आणि आंबवली परिसरात मोठ्या प्रमाणात दिव्यातील नायजेरियन नागरिकांप्रमाणे संपूर्ण इराणी टोळीच वास्तव्य करीत आहे. या टोळीतील सराईत गुन्हेगार हे बहुतांश गजाआड करण्यात पोलिसांना यश आलेले आहे. तर आता त्यांच्या जागी नवख्या आणि पोलीस रेकॉर्डवर नसलेल्या इराणी टोळीच्या सदस्यांनी घेतलेली आहे. सदरची इराणी टोळी आंबिवली, भिवंडी आणि मुंब्रा परिसर आहे. तर सोनसाखळी चोरीचा धोका पत्करण्याऐवजी आता इराणी चोरटयांनी मोर्चा महागड्या मोबाईल चोरीत शिरकाव केल्याचे दिसत आहे. शहरात सोनसाखळी खेचण्याचे प्रकार मांडलेले आहेत. तर चालणार्या, उभ्या असलेल्या आणि रिक्षातून प्रवास करणार्याचे मोबाईल दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी पळविल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे इराणी टोळी, चोरटे आणि ड्रग्ज तस्करांचे ठाणे पोलिसांना आव्हान ठरत आहे.