

डोंबिवली : शासन-प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा परवानग्या न घेता अवैधरित्या उभारण्यात येणाऱ्या बैठ्या चाळींतील खोल्या स्वस्त दराचे अमिष दाखवून गोरगरिबांना विकल्या जातात. अशा बेकायदा खोल्या विकून गलेलठ्ठ झालेल्या चाळ माफियांचे मनसुबे उधळून लावण्याचे फर्मान आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी काढले आहेत. (Indu Rani Jakhar, Commissioner of Kalyan-Dombivli Municipal Corporation)
रहिवासी राहण्यास येण्याआधीच अशी बांधकामे भुईसपाट करण्याचे आयुक्तांनी आदेश देताच सारी यंत्रणा कामाला लागली असून मांडा-टिटवाळ्यासह बल्याणी, उंभार्णी, मोहिली, द्वारलीपाड्यात आक्रमक कारवाई करून माफियांची पळता भुई थोडी केली आहे.
कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील महागणपतीच्या टिटवाळ्यात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने बैठ्या चाळीतील 5 खोल्यांसह 8 जोत्यांचे निष्कासन करून 9 नळ जोडण्या खंडित केल्या. 1/अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली बल्याणी, उंभार्णी आणि मोहिली परिसरातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची सुरू करण्यात आली. बल्याणी-उंभार्णी रोडला असलेल्या राजेश्वरी बिल्डिंग लगतचे 2 वाणिज्य गाळे व 3 खोल्यांचे बांधकामांसह 17 जोते अर्थात फाऊंडेशनवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलिस बंदोबस्तात अनधिकृत बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने 1 जेसीबी व 5 मजूरांच्या साह्याने करण्यात आली.
याच पथकाने मांडा-टिटवाळ्यातील गणेश वाडीमध्ये असलेल्या 5 खोल्यांच्या वीट बांधकामांसह 8 जोत्यांवर अर्थात फाऊंडेशनवर निष्कासनाची कारवाई केली. शिवाय अशा बांधकामांना जोडलेल्या 9 अनधिकृत नळ जोडण्या देखिल खंडित केल्या. याच जोत्यांवर येत्या काही दिवसांतच विटांचे बांधकाम करून खोल्या उभारल्या जाणार होत्या. मात्र तत्पूर्वीच अनधिकृत बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने 1 जेसीबी व 5 मजूरांच्या साह्याने या बांधकामांवर करण्यात आली. तर 9/आय प्रभागात सहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या पथकाने द्वारलीपाड्यातील 10 खोल्यांसह 16 जोत्यांच्या चालू बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली.