ठाण्यात अत्याचार, विनयभंगाच्या घटना वाढल्या

गुन्हेगारीच्या मुसक्या आवळण्यात ठाणे पोलिसांना यश
एप्रिल ते जुलै 2024 च्या आकडेवारीचा तक्ता
ठाण्यात आत्याचार विनयभंग आणि अपहरणाच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.pudhari news network
Published on
Updated on
ठाणे : सुरेश साळवे

असामाजिक तत्व आणि अपप्रवृत्तीच्या विरोधात उठलेला उद्रेक हा सर्वसामान्यांचा होता. प्रशासकीय कारवाईकडे दुर्लक्ष आणि दिरंगाईचे फलस्वरुप हा उद्रेक होता. महिला सुरक्षा कायदा आणि त्याची अंमलबजावणी यांच्यातील विसंगतीचा बदलापूर उद्रेक असल्याच्या विविध प्रतिक्रिया जनमानसातून उमटल्या. ठाणे पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून ठाणे परिसर स्वच्छ केला. दुसरीकडं पोलिसांचा तपास ही उत्तम आहे. मात्र अपप्रवृत्तींना आळा घालण्यात ठाणे पोलिसांना अपयश आल्याचे चित्र पाहायला मिळते. मुंबई, बदलापूर, ठाण्यातील हजुरीतील विनयभंग सारखा प्रकार त्याचबरोबर ठाण्यातही अशा प्रकारच्या निंदनीय घटना घडल्या. मागील चार महिन्याच्या कालावधीत ठाण्यात आत्याचार विनयभंग आणि अपहरणाच्या घटनेत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पाच परिमंडळाच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यात दाखल होणार्‍या खून, खुनाचा प्रयत्न अत्याचार, अपहरण, करून विनयभंग सारख्या गुन्ह्यांची वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामध्ये ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिलेल्या निर्देशानुसर ठाणे पोलीस दलाने उत्तम कामगिरी करत गंभीर गुन्हे करणार्‍या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळीत या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र या सर्वसामान्यांचे निगडित असलेल्या असामाजिक अपप्रवृत्तीच्या विनयभंग अत्याचार सारख्या घटनांना घालण्यात पोलिसांना कुठेतरी अपयश आल्याचं पाहायला मिळत आहे. मार्च ते जुलै या पाच महिन्याच्या कालावधीत ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील गंभीर आणि विविध गुन्ह्यांची संख्या वाढलेली असली तरी गुन्हे प्रकटणीकरनात पोलिसांना चांगले यश मिळालेले आहे.

अल्पवयीन मुलींना फुस लावण्याचे प्रकार वाढले

शाळकरी, अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या प्रकारात देखील वाढ झालेली आहे. मागील पाच महिन्याच्या कालावधीत ठाण्यात घर सोडून पळून गेलेल्या किंवा फूस लावून पळवून नेलेल्या अपह्त मुलींची संख्या देखील अधिक असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मार्च महिन्यात 83 मुली, एप्रिल महिन्यात 97 मुली, मे महिन्यात 107 मुली, जून महिन्यात 94 मुली, तर जुलै महिन्यात 102 मुली घरातून काही न सांगता निघून गेल्या किंवा आज्ञाताने त्यांना फूस लावून पळवून नेल्या. याकरता ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये यांच्या नोंदी रजिस्टर करण्यात आल्या असून अनेक मुलींना शोधून काढण्यात यश देखील मिळवलेले आहेे.

एप्रिल ते जुलै 2024 च्या आकडेवारीचा तक्ता

एप्रिल ते जुलै 2024 च्या आकडेवारीचा तक्ता
एप्रिल ते जुलै 2024 च्या आकडेवारीचा तक्ताpudhari news network

ठाणे पोलिसांची तारेवरची कसरत

ठाणे पोलीस दलाच्या आयुक्त पदाची सूत्रे आयुक्त म्हणून आशुतोष डुंबरे यांनी स्वीकारल्यानंतर ठाणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तरुण पिढी व्यसनाच्या आहार जाऊ नये म्हणून जनजागृती आणि अमली पदार्थांच्या तस्करांचे कंबरडेच मोडून टाकण्यात यशस्वी कामगिरी आपल्या सर्व ठाणे पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी वर्ग यांच्या माध्यमातून पार पाडली. अमली पदार्थाचे जंक्शन झालेलं ठाणे शहरात तस्करांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले. त्याचबरोबर ठाणे आयुक्तालयाच्या परिसरात भेडसावणार्‍या गुन्हेगारी गुन्हेगारी आणि सराईत गुन्हेगार यांच्या देखील मुसक्या आवळण्यात आल्या. दुसरीकडे असामाजिक प्रवृत्तींचा बंदोबस्त करताना ठाणे पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news