Illegal land registration: सातबारा न लावताच सरकारी जमिनीवरील घरांची दस्त नोंदणी

कल्याण सह दुय्यम निबंधक कार्यालयातील बेकायदेशीर कामांची चौकशी
Satbara
SatbaraPudhari
Published on
Updated on

ठाणे: कल्याण तालुक्यातील खडेगोळवलीमधील सर्व्हे नंबर 49 गुरुचरण असलेल्या सरकारी जमिनीवरील अनधिकृत चाळींचे बेकायदेशीरपणे खरेदी दस्त नोंदणी करण्यात आलेली आहे. यासाठी सात बारा उतारासह अन्य कागदपत्रांची पूर्तता न करता कल्याण येथील सह दुय्यम निबंधक वर्ग दोन मध्ये खरेदी विक्री खत तयार करण्यात आले आहेत.

याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी सह जिल्हा निबंधक यांना दिले आहेत. भाजप कल्याण पूर्वे मंडळाचे उपाध्यक्ष मारुती खबाले यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिल्याने कल्याणच्या सह दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी धास्तावले आहेत.

Satbara
Dry Fish Rate: सुक्या मासळीचे दर गगनाला; सोडे अडीच हजार तर, दाढा- खारा दोन हजार रुपये किलो

मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आलेल्या तक्रारीनुसार कल्याण तालुक्यातील खडेगोळवलीमधील सर्व्हे नंबर 49 ही जमीन गुरुचरण आहे. या सरकारी जमिनीवरील अनधिकृतपणे चाळी उभारण्यात आलेल्या आहेत.

या चाळीतील खोलीचे 7 ऑक्टोबर 2025 रोजी सह दुय्यम निबंधक वर्ग 2 येथे कायम खरेदी विक्री करार दस्त क्रमांक 18048/2025 हा फक्त टॅक्स पावती, लाईट बिल, नळ बिल या कागदपत्रांवर नोंदविण्यात आला.

Satbara
Census Duty: जनगणना कामात अडथळा, प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई

ही नोंदणी करताना सात बारा उतारा, आणि सर्व्हे नंबर नमूद केलेले नाही. सात बाराची प्रत देखील सदर दस्तात दाखल केलेली नाही. असे असतानाही बेकायदेशीपणे दस्त नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी खबाले यांनी 13 मार्च रोजी केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news