Thane Crime : रक्तदाब स्थिर करणार्‍या बेकायदेशीर औषधांचा 3 लाखाचा साठा जप्त

मिरा रोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलमासह औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियमा प्रमाणे गुन्हा दाखल
Fake hypertension drugs
रक्तदाब स्थिर करणार्‍या बेकायदेशीर औषधांचा 3 लाखाचा साठा जप्त file photo
Published on
Updated on

मिरा रोड : मिरा रोड येथे टर्मिवा व इतर परिशिष्ठ एच प्रकारातील औषधे 3,21,902 रूपये किंमतीचा बेकायदेशीर साठा गुन्हे प्रकटीकरण कक्ष 1 काशिमीरा यांनी जप्त केला आहे. मिरा रोड परिसरातील शॉप नं.08 आकार सोसायटी, कनकिया पोलीस स्टेशन समोर असलेल्या के 5 फिटनेस अँड वेलनेस सेंटर या दुकानातून विनापरवाना खरेदी, विक्री व साठा करण्यास प्रतिबंध असताना बेकायदेशीरपणे कोणत्याही वैदयकीय व्यावसायिकाच्या लेखी चिड्डी शिवाय रक्तदाब स्थिर करण्यासाठी वापरात येणारे टर्मिवा या परिशिष्ठ एच प्रकारातील औषधाची गैरमार्गाने मिरा भाईंदर परिसरातील शरीर सौष्ठव करणार्‍या व्यक्तींना तसेच युवकांना सर्रास विक्री करत असून त्याद्वारे मिरा-भाईंदर परिसरातील युवकांच्या जिवितास धोका निर्माण होत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण कक्ष 1, काशिमीरा यांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीवरुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी रात्री औषध निरीक्षक, मिरा रोड यांना सोबत घेवून बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर त्या दुकानावर छापा टाकला असता दुकानातून टर्मिवा ( मेफेंटर्माईन सल्फेट इंजेक्शन ) 10 एमएल या औषधाच्या एकूण 407 बाटल्या व इतर वेगवेगळ्या प्रकारची औषधे, इंजेक्शनस् बेकायदेशीरपणे साठा करून ठेवल्याचे आढळून आले.

हे दुकान हे आरोपी कन्हैय्या वकिल कनोजिया याचे असल्याचे व आरोपी अमन कृष्णा कनोजीया (19 ) हा त्या ठिकाणी काम करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, आरोपीच्या राहत्या घरी नर्मदा पॅरेडाईज, भाईंदर पूर्व याठिकाणी देखिल आरोपीने नमूद औषधांचा साठा करून ठेवल्याचे समजल्याने त्याठिकाणी देखिल छापा टाकला असता त्या ठिकाणी या औषधाच्या एकूण 233 बाटल्या साठा करून ठेवलेल्या आढळून आल्या.

या छाप्यामध्ये टर्मिवा या औषधाच्या एकूण 640 बाटल्या व इतर वेगवेगळ्या प्रकारची परिशिष्ठ एच या प्रवर्गात मोडत असलेली औषधे असा एकूण 3,21,902 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील पाहिजे आरोपी कन्हैय्या वकिल कनोजिया याचा शोध सुरू आहे. आरोपी विरुध्द मिरा रोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलमासह औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियमा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news