Ghodbunder Road Tanker Accident: मेट्रोसाठी खोदलेल्या खड्ड्यात कंटेनर कोसळला; घोडबंदर मार्गावर मोठा अपघात

चालक किरकोळ जखमी
Ghodbunder Road Tanker Accident
Ghodbunder Road Tanker AccidentPudhari
Published on
Updated on

ठाणे: अपघातांसाठी ब्लॅकस्पॉट ठरलेल्या घोडबंदर मार्गावर रविवारी पहाटे मोठा अपघात झाला. घोडबंदर मार्गावरील मानपाडा परिसरात मेट्रोच्या कामासाठी खोदून ठेवलेल्या १० फूट खोल खड्ड्यात सुमारे २५ टन वजनाचा टँकर पडला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

यामध्ये टँकरमध्ये फसलेल्या चालकाला काढण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले. काही दिवसांपासून मेट्रो मार्गासाठी सुरू असलेल्या कामांमुळे घोडबंदर भागात अपघात वाढले असून वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Ghodbunder Road Tanker Accident
Anti Mosquito Larvicide Drive: मच्छर रोखण्यासाठी अळीनाशक फवारणी! मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागाची विशेष मोहीम

ठाणे-घोडबंदररोड मार्गावरील दोस्ती इम्पेरिया समोर, चितळसर-मानपाडा पोलीस स्टेशनजवळ ठाण्याकडून घोडबंदर रोडकडे हा टँकर चालला होता.

मात्र मानपाडा परिसरात या कंटेनरच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन मेट्रो ब्रिज प्रकल्प अंतर्गत, पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या १० फूट खड्ड्यात कंटेनर पडला.सोबत चालकही खड्ड्यात पडल्याने तो कंटेनरमध्येच अडकून पडला होता. कंटेनरमध्ये सुमारे २५ टन भंगार टायर असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

चालकाचे नियंत्रण सुटून कंटेनर उलटला...

अपघातात जखमी अमित यादव (३०) हा सदरचा कंटेनर न्हावा-शेवा येथील २५ टन भंगार घेऊन गुजरात राज्याकडे घोडबंदर रोडवरून निघाला होता.

Ghodbunder Road Tanker Accident
Food License Suspended: 'मित्रां दा ढाबा'वर अन्न- औषध प्रशासनाची कारवाई

तो घेऊन कंटेनर चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्यानंतर दोस्ती इम्पोरियल येथे चालक अमित यादव याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर उलटला तो थेट मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात १० फूट खाली पडला.

या अपघातात कंटेनर चालक अमित अडकला होता. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चितळसर-मानपाडा पोलीस कर्मचारी, मेट्रो प्रकल्प कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान पोहोचल्यानंतर त्याला सुखरूप बाहेर काढण्‍यात आले.

चालकाला सुखरूप बाहेर काढले

कंटेनरमधील वाहन चालक अमित यादव यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे १५ मिनिटाच्या प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढल्यावर रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. यानंतर त्यांना चितळसर-मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी सदर खड्डा व वाहनाभोवती धोकापट्टी बांधून बॅरिगेटिंग करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news