Ganeshotsav Celebration : सातासमुद्रापार दुबईत सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात

दुबईस्थित भारतीयांनी केली यंदा डोळ्यांचे पारणे फेडणारी सजावट
डोंबिवली , ठाणे
महाराष्ट्रासह हिंदुस्तानातच नव्हे तर आपल्या देशाबाहेर देखील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होऊ लागला आहे.Pudhari News Network
Published on
Updated on

डोंबिवली (ठाणे) : ब्रिटिश इंग्रज राजवटीत सर्वांनी संघटित व्हावे यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. तेव्हापासून महाराष्ट्रासह हिंदुस्तानातच नव्हे तर आपल्या देशाबाहेर देखील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होऊ लागला.

दुबईने तरी का मागे राहायचे?

दुबईस्थित भारतीयांनी यंदा डोळ्यांचे पारणे फेडणारी सजावट करून गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. यंदा इन्स्पायर इव्हेंट्स आणि दुबईतील विविध सामाजिक संघटना, कंपन्या, सांस्कृतिक मंडळे व मित्रपरिवाराच्या पुढाकाराने दुबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यावेळी भव्य असा बारा ज्योतिर्लिंग विषयक देखावा साकारण्यात आला आहे, जो समस्त दुबईकरांचे आकर्षण बनला आहे.

मनखुल दुबईतील कुवैत स्ट्रीटला असलेल्या वेस्टझोन प्लाझा हॉटेल अपार्टमेंट्समध्ये बुधवारी सकाळी श्रीमंत ढोल-ताशा पथकाच्या वादनाने गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर मंडप वजा सभागृहात प्रतिष्ठापना सोहळा पार पडला. त्यानंतर भजन व सामूहिक गणेश जाप, दुपारची आरती, अथर्वशीर्ष पठण, सांस्कृतिक कार्यक्रम,

संध्याकाळची आरती, गणेश भजन व जागरण अशा कार्यक्रमांची दिवसभर रेलचेल सुरू होती. गुरुवारी सकाळपासून गणेश पूजन, आरती, भजन, सामूहिक गणेश जप झाल्यानंतर संध्याकाळी बाप्पाच्या विसर्जनाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुबईसारख्या राष्ट्रात सलग दुसऱ्या वर्षीही गणेशोत्सवात हजारो भाविक एकत्र आले आणि त्यांनी उत्साहात गणेशोत्सव साजरा केला.

जगासमोर नवा आदर्श

एक वेगळा आदर्श संपूर्ण जगासमोर स्वागत मिरवणूक, प्रतिष्ठापना, दिवसभरात धार्मिक/अध्यात्मिक कार्यक्रम, महाआरतीद्वारे दीड दिवस केलेली बाप्पाची सेवा आणि शिस्तबद्ध पद्धतीने काढलेली विसर्जन मिरवणूक, अशा या गणेशोत्सवाने एक वेगळा आदर्श संपूर्ण जगासमोर ठेवला आहे. बाप्पाचे विधिवत पूजन आणि आरती करून एका फार्म हाऊसमधील तळ्यात बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. सर्वांच्या लाभलेल्या सहकार्यामुळेच यंदाही गणेशोत्सव अत्यंत उत्साहात साजरा झाल्याच्या भावना चंद्रशेखर जाधव यांनी व्यक्त केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news