Thane Fire News | वाड्यातील चार दुकाने जळून खाक; शहरातील अग्निशमन यंत्रणा धूळखात

वाड्यात चार दुकानांना भीषण आग; पाच तास शर्थीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात
wada thane
वाडा शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या चार दुकानांना आग लागली.pudhari news network

वाडा : वाडा शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या चार दुकानांना रविवार (दि.२१) रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. हॉटेल, हार्डवेअर, कपडे व भांड्यांच्या दुकानाचे गोदाम अशा दुकानांचा यात समवेश आहे. वाडा नगरपंचायत कडे अग्निशमक यंत्रणा असूनही ती तांत्रिक कारणामुळे धुळखात पडल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

Summary

वाडा शहरातील मुख्य बाजारपेठेत कपड्यांचे एक होलसेल दुकान, मातोश्री हार्डवेअर, महावीर स्टील व शेजारील एका हॉटेलला रविवार (दि.२१) रोजी ही आग लागली. या आगीत काही गोदामेही जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच पालघर, जव्हार व वसई येथील अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दरम्यानच्या दोन तासांच्या कालावधीत ही दुकाने व गोदाम जळून खाक झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तास शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. या आगीत २० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानांच्या मालकांनी दिली आहे.

सकाळी सुरुवातीला एका दुकानात आग लागली मात्र बघता बघता यात चारही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. आगीचे कारण शॉकसर्किट असल्याचे सांगण्यात येत असले तरी यात व्यवसायिकांचे मात्र आतोनात नुकसान झाले आहे. वाडा ही मोठी औद्योगिक वसाहत असूनही या ठिकाणी कोणतीही अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नाही ही खेदाची बाब आहे. वाडा नगरपंचायतीकडे अग्निशमन यंत्रणा उभी आहे मात्र तज्ज्ञ कर्मचार्‍यांच्या अभावी ती धुळखात पडली आहे.

आगीच्या घटना घडतात, लोकांचे आतोनात नुकसान होते, रहिवाशी भीतीच्या छायेत राहतात, कारखाने व व्यावसायिक बरबाद होतात मात्र याचे सरकारला काही घेणदेण नाही का अशा शब्दात लोकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान आग लागल्याच्या दोन तासानंतर पालघर व जव्हार नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याने उर्वरित आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. बघ्यांची गर्दी कामात अडथळा निर्माण करीत असली तरी कौतुकास्पद म्हणजे या सर्व घटनेदरम्यान वाडा शहरातील स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यात मोठा सहभाग दर्शविला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news