

नेवाळी : उत्पन्नात घट झाल्याने सुक्या मेव्यातील खोबर्याच्या भावात पूर्वीपेक्षा तीन पटीने वाढ झाली आहे. खोबर्याच्या किमतीत आपर्यंत सर्वाधिक दरवाढ झाल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे. किरकोळ बाजारात सोमवारी सुक्या खोबर्याची किंमत प्रति किलो 530 रुपये झाल्याने गृहिणींचा महिन्याचा बजेट विस्कळीत झाला आहे. मात्र उत्पन्नात वाढ झाल्यानंतर येत्या काही दिवसात खोबर्याचे दर कमी होण्याचे संकेत व्यापार्यांकडून देण्यात आल्याची माहिती दुकानदार देत आहेत.
सण उत्सवांचा काळ जवळ येत असताना बाजारात मोठी दरवाढ सुरु झाली आहे. खोबर्याच्या किमतीत अचानक तिप्पट वाढ झाल्याने खरेदीसाठी जाणार्या महिला वर्गाला मोठी काटकसर करावी लागत असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येत आहे. उत्पन्नात घेत झाल्याने वाढ झाल्याची माहिती दुकानदार देत असल्याने येत्या काळात सण उत्सवात त्याचा मोठा फटका बसणार आहे. श्रावण महिना सुरु होत असल्याने सार्वजनिक सण जवळ येत आहेत.
सोमवारी कल्याण डोंबिवली सह आजूबाजूच्या परिसरातील दुकानांमध्ये किरकोळ विक्रेत्यांकडून 530 रुपयांचा प्रति किलोला दर आकारला जात आहे. वेळेत आवक न वाढल्यास आणखी दर वाढ होणार असल्याचे संकेत दुकानदार देत आहेत. त्यामुळे आता महिलावर्गाला दररोजच्या जेवणात खोबरा टाकताना काटकसर करावी लागणार आहे.