Thane | अंगणवाडीतील पोषण आहारात आढळले जीवजंतू

भिवंडीतील अंगणवाडीत मुलांच्या आरोग्याला धोका; पालकांची तक्रार
Thane | अंगणवाडीतील पोषण आहारात आढळले जीवजंतू

पडघा : भिवंडी तालुक्यातील पडघा - भादाणे येथील अंगणवाडीत एकात्मिक बाल विकास प्रकल्पाद्वारे देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये जीव, जंतू, पोपेटे पाखरे, दगडाच्या भूशासारखी बारीक कच, अशा लहान मुलांच्या आरोग्यास हानिकारक असणाऱ्या गोष्टी सापडल्यामुळे पालकांमध्ये नाराजी पसरली असून लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रत्येक गावातील अंगणवाड्यांमध्ये एकात्मिक बाल विकास विभागातर्फे तीन वर्षांच्या मुलांपर्यंत खाद्यपदार्थ जसे खिचडी शिजवण्यासाठी कच्च्या पोषण आहाराचे पाकीट देण्यात येत असते. परंतु भादाणे येथील अंगणवाडीत देण्यात येणाऱ्या खिचडी पाकिटामध्ये अशा प्रकारचे शरीरास हानिकारक असणाऱ्या वस्तू व जीवजंतू आढळल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Thane | अंगणवाडीतील पोषण आहारात आढळले जीवजंतू
ठाणे : असेल आधार तरच मिळेल पोषण आहार

भादाणे येथील रहिवासी अशोक बुधाजी पाटील यांच्या मुलाला देण्यात येणाऱ्या खिचडीच्या बंद पाकिटामध्ये हे सर्व प्रकार दिसून आल्याने त्यांनी एकात्मिक बाल विकास विभाग, भिवंडी यांच्याकडे लेखी तक्रार करून संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सर्व खाद्यपदार्थ हे थेट कोकण भवन आयुक्त यांच्यामार्फत अंगणवाडीत पोहच केले जातात. आम्ही फक्त इथून मागणी पाठवीत असतो. त्यामुळे सदर तक्रार आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयात ठाणे येथे पाठविली आहे. सर्व ठिकाणी कोकण भवन आयुक्त यांच्या मार्फतच खाद्यपदार्थाचा पुरवठा केला जातो. तक्रारदाराला गेलेले खाद्यपदार्थाचे पाकीट कालबाह्य (२२ जून) झालेले असून बाकीच्या पाकिटांची मुदत सप्टेंबर २०२४ पर्यंत होती.

- सुलभा अडसुळे, प्रकल्प अधिकारी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news