भिवंडी : शेतकर्यांचा सातबारा कोरा व्हावा या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील दोघा शेतकर्यांनी पायी मंत्रालय पदयात्रा सुरू केली असून 450 किलोमीटर अंतर पार करून ते भिवंडीत शनिवारी विसाव्या आले आहेत.सोमवारी विधानभवना समोर हे दोघे शेतकरी समस्त शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी करणार आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी अहमदपूर तालुक्यातील एक वृद्ध शेतकरी आपल्या खांद्या वर औत लाऊन पत्नीसह शेताची मशागत करतानाच व्हिडिओ व्हायरल झाला.याची चर्चा विधानभवनात झाली.त्यावेळी कृषी मंत्री उपमुख्यमंत्री यांनी तत्काळ वृद्ध शेतकर्याचे कर्ज माफीची घोषणा करून सातबारा कोरा करीत असल्याचे सांगितले.
या घटनेनंतर अहमदपूर तालुक्यातीलच धानोरा बुद्रुक या गावातील शेतकरी सहदेव होणाळे यांनी शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी प्रत्येकाने शेतात औत खांद्यावर घेऊन नांगरणी करण्याची गरज आहे का असा प्रश्न उपस्थित करीत स्वतः मंत्रालय विधानभवन येत पर्यंत खांद्यावर औत घेऊन निघण्याचा निर्णय घेतला.4 जुलै पासून सहदेव यांनी आपला पती प्रवास सुरू केला.
दरम्यान याच जिल्ह्यातील झरी खुर्द,ता.चाकुर येथील शेतकरी मित्र गणेश सूर्यवंशी यांना ही माहिती मिळताच त्यांनी त्यांचे मन वळवण्या साठी धाव घेतली.पण सहदेव यांनी आता माघार नाही यायचे तर सोबत या म्हणून हाक दिल्यावर गणेश हा सुद्धा त्यांच्या सोबत 6 जुलै पासून सोबत होऊन पायी निघाले आहेत.
अहमदपूर ते मुंबई या 500 किलोमीटर अंतराच्या प्रवासातही 450 किलोमीटरचा पल्ला त्यांनी पार केला.या दरम्यान या दोघांच्या पायानं फोड आले, पाय सुजले पण चाळण काही थांबवलं नाही. माझ्यावर कर्ज दीड लाखाचे आहे. ते मी फेडेल पण राज्यातील अनेक शेतकरी आज ही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.त्यांना न्याय कोण देणार एका वृद्ध शेतकर्याची व्यथा व्हायरल व्हिडिओ मुळे दिसून येते मग इतर शेतकर्यांच्या व्यथा मायबाप सरकारला कधी दिसणार असा सवाल सहदेव होणाळे यांनी उपस्थित केला आहे.राज्यात मराठा व ओबीसी समाजात राजकारण्यांनी भांडण लाऊन स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला गेला.
दुर्दैव म्हणजे त्यामुळे शेतकर्यांच्या मूळ प्रश्ना कडे दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे शेतकर्यांच्या मूळ प्रश्नाला हात घालण्यासाठी ओबीसी समाजाचा सहदेव निघाला त्याला साथ देण्यासाठी मी मराठा त्याच्या सोबत निघालो आहे अशी प्रतिक्रिया गणेश सूर्यवंशी यांनी दिली आहे.