

ठाणे : ठाणे स्टेशन परिसरात बनावट प्लेसमेंट आणि बेकायदेशीर शैक्षणिक संस्था थाटून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळले. सदर प्रकारचा जाब विचारण्यासाठी भाजपचे माजी शहराध्यक्ष संजय वाघुले त्यांची कन्या आणि विद्यार्थी पालकवर्ग यांच्यासह स्टेशन परिसरातील खाजगी संस्थेद्वारे फसवणूक केलेल्या विद्यार्थ्यांसाठी धडकले असता संस्था संचालक डॉ. प्रमोदकुमार मोर्या यांच्या कार्यालयात कार्यकर्ते आणि पालकांसह गेले होते.
यात झालेल्या वाद विवादानंतर नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रारदार मोर्या यांनी भाजपचे माजी शहराध्यक्ष संजय वाघुले, त्यांची कन्या आणि पालक, कार्यकर्ते अशा 36 जणांच्या विरोधात बेकायदेशीर जमाव जमवुन 22 लाख मागितल्याचा गुन्हा दाखल केला. याचाच जाब विचारण्यासाठी भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी गुरुवारी संध्याकाळी पोलीस ठाण्यात विद्यार्थी, पालक आणि कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडला. घटनास्थळी नौपाडा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे-ढमाळे आणि खा. नरेश म्हस्के उपस्थितीत झाले.
नौपाडा पोलिसांनी कुठलीही शहानिशा न करता अल्पवयीन मुलींवर आणि विद्यार्थिनींवर दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत आक्षेप नोंदवित ठिय्या मांडून नौपाडा पोलीस ठाण्यात बसलेल्या भाजप माजी खा. किरीट सोमय्या यांनी नौपाडा पोलिसांच्या बाबत केंद्रीय आणि राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क करीत गुन्ह्याबाबत माहिती दिली. तसेच तक्रारीची प्रत मोबाईलवर पाठवीत असल्याचे सांगितले. बराच वेळेनंतर खा. म्हस्के हे निघून गेले मात्र करीत सोमय्या हे नौपाडा पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते.