Ulhasnagar Crime : उल्हासनगर हत्याकांड तपासाला वेग

बंदूक पुरवणाऱ्यासह चार जणांना अटक
Ulhasnagar Crime
उल्हासनगर हत्याकांड तपासाला वेगpudhari photo
Published on
Updated on

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प ५ येथील कैलाश कॉलनी परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या तुफानी गोळीबार आणि दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांकडून सातत्याने मोठी कारवाई सुरू आहे.या प्रकरणी चार आरोपी हे पोलिस कोठडीत आहेत. आज बंदूक पुरवणाऱ्यासह आणखीन चार आर-ोपींना अटक करण्यात आल्याने अटक आरोपी संख्या आठ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात जुन्या वादातून झालेल्या या रक्तरंजित घटनेत सख्खे भाऊ अनिल हरकेश चौहान आणि अमन हरकेश चौहान यांचा गोळी लागून मृत्यू झाला होता, तर अर्जुन सूरजबली चौहान हा गंभीर जखमी झाला होता. घटनेनंतर कैलाश कॉलनीसह संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला.

Ulhasnagar Crime
Washim Crime : मंगरुळपीर हादरले! १९ लाखांचा गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

तपासादरम्यान उल्हासनगर गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले. सर्वप्रथम गुन्हे शाखेने शेखर बिराजदार आणि अजय राव यांना अटक केली, तर तिसरा आरोपी अजित शेख याला हिललाइन पोलिसांनी ताब्यात घेतले. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यानंतर पोलिसांनी सागर पाटील यालाही अटक केली. सागर पाटीलच्या अटकेनंतर पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू ठेवला.

Ulhasnagar Crime
Ahilyanagar Sandalwood Theft: वन विभागातून चंदन चोरी; कर्मचाऱ्याला बांधून दोन आरोपी अटकेत

दरम्यान, पुढील तपासात या हत्याकांडात इतर आरोपींचाही सहभाग असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले. त्याआधारे पोलिसांनी २६ मे रोजी बद्रुद्दीन खान, अमन मनोहर चौहान, कल्पेश सुनील म्हात्रे आणि प्रणय सचिन निकम यांना अटक केली. प्रणय निकम याच्यावर हल्लेखोरांना बंदूक पुरवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news