Eco-Sensitive Zone: राज्यातील २५१५ गावे संवेदनशील

ठाणे जिल्ह्यात २०८ तर पालघरमध्ये १२६ गावांचा समावेश
वेस्टर्न घाट इकोसेन्सिटिव्ह एरिया
वेस्टर्न घाट इकोसेन्सिटिव्ह एरियाpudhari news network
Published on
Updated on
रायगड : जयंत धुळप

राज्यातील २५१५ गावे संवेदनशील (वेस्टर्न घाट इकोसेन्सिटिव्ह एरिया) म्हणून घोषित करण्यात आली आहेत. भारत सरकार राजपत्र, पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालय प्रारूप अधिसुचना ३१ जुलै २०२४ अन्वये एकुण ५६ हजार ८२५ चौरस किमी क्षेत्रासंबंधी प्रारूप अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. या अधिसुचनेत राज्यातील १३ जिल्ह्यातील २५१५ गांवांतील १७ हजार ३४० चौ. किमी क्षेत्राचा समावेश आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील २०८ तर पालघरमधील १२६ गावांचा सामावेश आहे.

राज्यातील १३ जिल्ह्यातील २५१५ गावांपैकी सर्वाधिक ४३६ गावे रायगड जिल्ह्यातील आहेत. उर्वरित जिल्ह्यात अहमदनगर ४८, धुळे ०२, कोल्हापूर २१२, नंदुरबार ०२, नाशिक २०३, पालघर १२६, पूणे ४१४, रत्नागिरी ३११, सांगली १२, सातारा ३३६, सिंधुदुर्ग १९८ आणि ठाणे जिल्ह्यातील २०८ गावांचा समावेश आहे. पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात देशातील सहा राज्यातील एकुण ५६ हजार ८२५ चौरस किमी क्षेत्रापैकी सर्वाधिक २० हजार ६६८ चौ. किमी क्षेत्र कर्नाटक मधील तर त्या खालोखाल १७ हजार ३४० चौ. किमी क्षेत्र महाराष्ट्र राज्यातील आहे. उर्वरित राज्यात गुजरात ४४९ चौ. किमी, गोवा १,४६१चौ. किमी, तामीळनाडू ६,९१४ आणि केरळ मधील ९.९९३.७ चौ. किमी क्षेत्राचा समावेश आहे. अधिसुचनेस अंतिमस्वरूप प्राप्त होण्यापूर्वी प्रारूप अधिसूचनेत नमुद केलेल्या क्षेत्रातील लोकप्रतिनिधी वा स्थानिक रहिवासी यांना कोणत्याही प्रकाराच्या सूचना, हरकती अगर तक्रारी असल्यास, त्यांनी त्यांच्या सुचना, आक्षेप लेखी स्वरूपात ६० दिवसांच्या आत केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने क वातावरण बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवीं दिल्ली यांच्याकडे किंवा ई-मेला आयडीवर est-melnic.in येथे नोंदविणे आवश्यक आहे.

इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणजे काय ?

दुर्मिळ प्राणी, पक्षी, झाडे, वनऔषधी व जंगल अशी जैवविविधता असलेले क्षेत्र म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन. पर्यावरणाचा समतोल टिकवण्यासाठी त्याचे जतन आवश्यक असते. त्यासाठी काही नियम ठरवले जातात. महाराष्ट्रातील पाचगणी, माथेरान आणि महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणांचा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये यापूर्वीच समावेश करण्यात आला आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news