Durgadi Forts Kalyan | कल्याणातील दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण भिंत कोसळली

Thane News | अन्य तीन ठिकाणी बुरुज्याचा काही भाग कोसळला .
कल्याण (ठाणे)
कल्याण मधील शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळली...(छाया : संजय भोईर)
Published on
Updated on

MLA Vishwanath Bhoir took exception to the substandard work done by the PWD department contractor

कल्याण (ठाणे) : कल्याणातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या संरक्षक भिंत व बुरुजाचा काही भाग बुधवारी पहाटेच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली. अवघ्या काही मिनिटांच्या पावसामुळे ही संरक्षक भिंत कोसळल्याचे कारण पी.डब्ल्यू.डी च्या ठेकेदाराने आपली जबाबदारी झटकून दिली. दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीसाठी शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून केले जात असलेले काम बेजबाबदारपणाचे व निष्कृष्ठ दर्जाचे केले असल्याने आमदार विश्वनाथ भोईर यांनी ठेकेदाराला फैलावर घेतले.

कल्याणची अस्मिता , ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला हा शहराची शान आणि प्राचीन वैभव आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या दुर्गाडी किल्ल्याच्या दुरुस्ती आणि डागडुजीचे काम केले जात आहे. डागडुजीचे काम सुरू असतानाच बुधवारी पहाटेच्या सुमारास या किल्ल्याच्या गोविंदवाडी बायपास दिशेला असलेल्या संरक्षण भिंतीचा भला मोठा भाग अचानक कोसळलाने या घडलेल्या घटने बाबत ठेकेदाराला कोणतेच सोयरसुतक नसल्याने साधी पाहणी करण्यासाठी सुद्धा आला नसल्याने ठेकेदाराला या घटनेचे गंभीर नसल्याचे दिसून आले होते. दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीच्या कामा साठी शासनाने १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून या निधीतून किल्ल्याच्या डागडुजीचे काम सुरू आहे.कामासाठी वापरले जाणारे साहित्य निकृष्ठ दर्जाचे वापरले जात असल्याने सदरचा हा प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे .

Thane Latest News

किल्ल्याची भिंत तसेच काही ठिकाणी बुरुजाचा भाग कोसळल्याची माहिती मिळताच कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आणि जिल्हाप्रमुख अरविंद मोरे या दोघांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या संबंधित ठेकेदाराच्या अधिकाऱ्याला त्यांनी चांगलेच फैलावर घेतले. पाऊस सुरू असतानाही भिंत बांधायचे काम का सुरू ठेवले ? एवढ्या मोठ्या प्रमाणात भिंत कोसळली आहे त्यात जीवितहानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण? तसंच येत्या दोन दिवसात असलेल्या बकरी ईदनिमित्त मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव या ठिकाणी नमाज पडण्यासाठी येणार आहेत. त्यावेळी मोठी दुर्घटना झाली तर जबाबदारी कोण घेणार ? अशा संतप्त प्रश्नांची सरबत्ती आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केली. तसेच आमदार विश्वनाथ भोईर यांनी या भिंतीच्या कामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.यासंदर्भात पी डब्ल्यू डी आणि पुरातत्त्व खातं हे एकमेकांकडे बोट दाखवत आहे. तर कंत्राटदार याठिकाणी यायलाही तयार नाहीये. लवकरात लवकर संबंधित ठेकेदार याठिकाणी उपस्थित झाला नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्या कंत्राटदाराला धडा शिकवू असा सज्जड दमही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिला.यावेळी माजी नगरसेवक जयवंत भोईर, अरविंद मोरे, कासिफ तानकी, माजी परिवहन समिती सदस्य आणि शिवसेनेचे उपशहरप्रमुख सुनिल खारूक यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news