Thane News | ठाणे शहरात ड्रोन उडविण्यास मनाई; पोलीस आयुक्तांचे प्रतिबंधात्मक आदेश

Thane Drone Ban | कायदा - सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले
 drone
प्रातिनिधिक छायाचित्र (Pudhari Photo)
Published on
Updated on

Police Commissioner Order Drone Ban in Thane City

ठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आता ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई वस्तू (Unmanned Aerial Vehicles - UAVs) उडवण्यास मनाई करण्यात आली आहे. शहरात काही समाजकंटकांकडून या उपकरणांचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊ नये, यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे, असे ठाणे शहर उपायुक्त (विशेष शाखा) डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी आदेश जारी केले आहेत.

ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही व्यक्तीला ड्रोन किंवा तत्सम उपकरणे उडवण्यास मनाई असेल. हा आदेश दि.14 मे 2025 पासून लागू झाला असून 3 जून 2025 पर्यंत तो अंमलात राहील.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 आणि इतर लागू कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य आणि तातडी लक्षात घेऊन हा आदेश तातडीने लागू करण्यात आला आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.

 drone
Nashik Police | शिस्त मोडणाऱ्या पोलिसांना पुन्हा पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news