Dombivli Water Supply | डोंबिवलीकरांना दिलासा: बारवी धरणातून गुरूवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय मागे

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत राऊत यांची माहिती
Barvi Dam Shutdown
Barvi Dam ShutdownPudhari
Published on: 
Updated on: 

Barvi Dam Water Supply

डोंबिवली : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी जलशुद्धीकरण केंद्राच्या जांभूळ येथून होणारा पाणीपुरवठा गुरूवारी रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा नियोजित शटडाऊन रद्द करण्यात आला आहे. ही माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत राऊत यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे संबंधितांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार या वर्षी पावसाळ्यात पाऊस कमी पडल्यामुळे आणि एल निनोच्या प्रभावामुळे ऑक्टोबर पासून मान्सूनने लवकर माघार घेतल्यामुळे, तसेच पुढील वर्षी पाऊस कमी पडण्याची शक्यता असल्यामुळे बारवी धरणातील उपलब्ध पाणी साठा ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत योग्य नियोजन करता यावा, यासाठी १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Barvi Dam Shutdown
Kalyan-Dombivli Water Crisis: केडीएमसीचा पाणीटंचाई कृती आराखडा कागदावरच

त्यानुसार दर आठवड्याला गुरूवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे ठरले होते. मात्र या आठवड्यातील २६ नोव्हेंबरचा शटडाऊन रद्द करण्यात आल्यामुळे डोंबिवलीसह परिसरातील रहिवासी, महानगरपालिका, ग्रामपंचायती आणि उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला. या कालावधीत बारवी धरणातून पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

पुढील शटडाऊन ३ डिसेंबरपासून लागू

दरम्यान, पुढील शटडाऊन गुरूवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ते शुक्रवारी ४ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत नियोजित असून त्यानंतर दर आठवड्याच्या गुरूवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहितीही परिपत्रकात देण्यात आली आहे. त्यामुळे रहिवासी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि उद्योजकांनी पुढील काळात पाण्याचे योग्य नियोजन करून सहकार्य करण्याचे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.