Dombivli Water Supply | डोंबिवलीकरांना दिलासा : दिवाळी सणामुळे दोन आठवड्यांची पाणी कपात रद्द

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसीकडून दोन आठवड्यांची पाणी कपात रद्द करण्याचा मोठा निर्णय
Water Supply Cut
Water Supply Cutpudhari photo
Published on: 
Updated on: 

KDMC Water Cut

डोंबिवली : कमी पाऊस आणि एल निनोच्या प्रभावामुळे बारवी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने दर आठवड्याला पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला असताना डोंबिवलीकरांसाठी एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसीकडून दोन आठवड्यांची पाणी कपात रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत राऊत यांनी याबाबत अधिकृत सूचना जारी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने ५ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या निर्णयानुसार या वर्षी पावसाळ्यानंतरचा कमी पाऊस, एल निनोचा प्रभाव आणि ऑक्टोबर पासून मान्सूनने लवकर माघार घेतली.

Water Supply Cut
Dombivli Water Theft | काटई-बदलापूर महामार्गावर पाणी चोऱ्यांचा भांडाफोड; एमआयडीसीने तोडली ४७ चोरटी कनेक्शन्स

तसेच अल निनोच्या प्रभावामुळे पुढील वर्षी पाऊस कमी पडण्याची शक्यता असून बारवी धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत योग्य नियोजन करता यावे, यासाठी शासन निर्णयाप्रमाणे आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये, यासाठी पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी जलशुद्धीकरण केंद्र, जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा प्रत्येक आठवड्याच्या गुरूवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत बंद करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात आला आहे, मात्र ५ नोव्हेंबर पासून दिवाळी सण सुरू होत असल्याकारणाने जनभावनेचा विचार करून नियोजित गुरूवारी ५ नोव्हेंबर रोजीची, तसेच पुढील गुरूवारी १२ नोव्हेंबर रोजीची पाणी कपात रद्द करण्यात येत आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे कार्यकारी अभियंता श्रीकांत राऊत यांनी कळविले आहे.

Water Supply Cut
Dombivli Smart Meter| डोंबिवलीमध्ये स्मार्ट मीटरवरून वाद पेटला

ही बाब संबंधित जनता, स्थानिक संस्था आणि महानगरपालिका, ग्रामपंचायती, उद्योजक आणि पाणी पुरवठ्याच्या इतर ग्राहकांच्या निदर्शनास आणण्यात येत असून या निर्णयामुळे दिवाळीच्या सणासुदीमध्ये कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.