ठाणे :डोंबिवली ते ठाणे दरम्यान जलद आणि आरामदायी प्रवासासाठी बहुप्रतिक्षित ई-वॉटर टॅक्सी प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. डोंबिवलीतील मोठागाव येथे जेट्टीचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, डिसेंबर २०२६ पर्यंत ही सेवा प्रत्यक्षात सुरू होण्याचा अंदाज आहे. डोंबिवलीतून आता थेट ठाणे गाठता येण्यासाठी हा पाण्यातून प्रवास सुरू होणार आहे. त्यामुळे ट्रॅफिकला बाय बाय करण्याची वेळ आता आली आहे.
लोकल अन् मेट्रोची तुफान गर्दी शिवाय रस्त्यावरील तासन्तास चालणाऱ्या ट्रॅफिक जॅममुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांसाठी ही 221-0008 दिलासादायक बातमी आहे. त्यामुळे डोंबिवली ते ठाणे या दोन शहरांमधील प्रवास आता थेट पाण्यातून होणार असून बहुप्रतिक्षित प्रकल्पाची नवी डेडलाईन अखेर जाहीर झाली आहे.
खरं तर रेल्वेवरील वाढता ताण कमी करण्यासाठी शिवाय जलद आणि सोपा पर्याय देण्यासाठी देण्यासाठी केंद्र सरकारने २०१६ मध्ये डोंबिवली-ठाणे या दरम्यान जलवाहतुकीची घोषणा केली होती. ज्यात पहिला टप्पा २०१८ मध्ये पहिला टप्पा सुरू करणार होते. मात्र योजनेत ठाण्यातील कोलशेत, घोडबंदर, काल्हेर तसेच डोंबिवली येथे जेट्टी उभारणे प्रस्तावित होते.
त्यानंतर कल्याण खाडीत मोठे खडक असल्याने त्या ठिकाणावरून जलवाहतूक करणे कठीण असल्याचे समोर आले होते आणि २०१९ मध्ये कल्याण शहराला या प्रकल्पातून वगळे होते. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी ६६१ कोटी रुपयांच्या निधीपैंकी डोंबिवली जेट्टीसाठी १३ कोटी मंजूर झाले सध्या पाहिले तर डोंबिवलीतील मोठागाव ते ठाणे गायमुख जेट्टीचे काम हे ७० टक्के पूर्ण झाले आहे. तर उर्वरित काम हे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करून वॉटर टॅक्सी ही २०२६ डिसेंबरपासून सुरू केली जाईल शिवाय रो-रो सेवा ही सुरू केली जाईल, अशी माहिती नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी दिली. दुसरीकडे लोकल सेवा आणि मेट्रोच्या संत गतीने त्रस्त झालेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ज्यात नागरिकांना आता फक्त आश्वासने नको आहेत, प्रत्यक्ष जलवाहतूक सुरू करा अशी ठाम मागणी केली आहे.
कसा असेल मार्ग
हा जलमार्ग डोंबिवली (मोठागाव जेट्टी) ते ठाणे, मिरा-भाईंदर, वसई आणि नवी मुंबई विमानतळापर्यंत जोडला जाणार आहे. लोकल ट्रेन आणि रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा त्रास टाळून नागरिकांना पर्याय देणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. दरम्यान सध्या मोठागाव येथील जेट्टीचे काम वेगात सुरू असून डिसेंबर २०२६ पर्यंत सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. तिकीट दर अद्याप निश्चित झालेले नाहीत.