डोंबिवली: खोणी पलावा येथे टेम्पोने ८ वाहनांना उडविले; झोमॅटो बॉयचा मृत्यू

खोणी पलावा येथे टेम्पोच्या धडकेत झोमॅटो बॉयचा मृत्यू
  Accident in Khoni Palava, Dombivli
डोंबिवली, खोणी पलावा येथे शनिवारी रात्री भीषण अपघात झाला.Pudhari News Network
Published on
Updated on

नेवाळी (ठाणे): पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली जवळील खोणी पलावा मध्ये शनिवारी रात्री भीषण अपघात घडला आहे. टेम्पो चालकाने टेम्पो आपल्या क्लिनरला चालवायला दिल्याने त्याने झोमॅटो बॉय सह समोर दिसतील त्या वाहनांचा चुराडा केला आहे. या अपघातात झोमॅटो डिलिव्हरी बॉय काही अंतरापर्यत फरफटत गेला होता. त्यात या झोमेटो बॉय चा मृत्यू झाला असून सौरभ यादव असे या मयत तरुणाचं नाव आहे. मनपा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी क्लिनरला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

  Accident in Khoni Palava, Dombivli
मुंबई : अवकाळीचा फटका! ठाणे-बेलापूर रोड वरील वाहतुकीत मोठा बदल

नेमका अपघात कसा घडला?

  • टेम्पो क्लिनरला चालवायला दिल्याने नियंत्रण सुटले

  • रस्त्याच्या वरील ७ ते ८ वाहने ठोकर देत उडविली

  • झोमॅटो बॉयला फरफटत नेल्याने त्याचा मृत्यू

  • क्लिनरला मानपाडा पोलिसांनी अटक केली

  Accident in Khoni Palava, Dombivli
ठाणे : धीम्या गतीच्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले; चाकरमान्यांचे हाल

अपघातानंतर परिसरातील नागरिक संतप्त

खोणी तळोजा महामार्गावर असलेल्या पलावा सिटीत शनिवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. क्लिनरचा टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या सात ते आठ दुचाक्यांना टेम्पोने धडक दिली. या अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव या परिसरात जमा झाला होता. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टेम्पो चा क्लिनर अतिष जाधव याला ताब्यात घेतले आहे.

  Accident in Khoni Palava, Dombivli
यूपीतील आणखी एक एमडी ड्रग्ज फॅक्टरी ठाणे पोलिसांकडून उद्ध्वस्त

अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

पोलिसांनी परिसरातील नागरिकांचा झालेला आक्रमक पवित्रा लक्षात घेता त्यांची समजूत काढली. पिकअप टेम्पो चालकाने क्लिनरला टेम्पो चालवायला दिल्याने हा अपघात घडला आहे. मात्र, या अपघातात एका निष्पाप तरुणाचा बळी गेला. तर सात ते आठ गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे क्लिनर सह टेम्पो मालकाविरोधात देखील गुन्हा दाखल करत कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या अपघाताचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांकडून  टेम्पो मालकाचा शोध सुरु आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news